बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी नगरपरिषद निवडणूकीत तिसरी आघाडी करणार – माजी सरपंच प्रा. कैलास माने

0
543

 

जामखेड प्रतिनिधी

                 जामखेड न्युज – – – – 

जामखेड शहरात मोठय़ा प्रमाणावर बहुजन समाज आहे. या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराज कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र घेऊन प्रबळ तिसरी आघाडी स्थापन करून नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे असे माजी सरपंच प्रा. कैलास माने सर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रा. कैलास माने यांनी सरपंच २०१० ते २०१४ अखेरपर्यंत सरपंच होते सरपंच पदाच्या काळात अनेक समाजोपयोगी कामांमुळे नेहमीच चर्चेत होते. सरपंच पदाच्या काळात शहरात संविधान चौकात कचरा डेपो होता त्याचा नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत होता.
आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यामुळे सरपंच माने यांनी तो कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला तो आयटीआय जवळ हलविला त्यामुळे संविधान चौकातील लोकांनी मोकळा श्वास घेतला
त्यामुळे आज आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून त्या जागी नाना नाणी पार्क, नगरपरिषद कार्यालय, अभ्यासिका हे उभे राहत आहे तसेच नदीच्या दोन्ही बाजूंनी रस्ते तयार झाल्याने सुशोभीकरण झाले आहे. हे सर्व कचरा डेपो हलविल्यामुळेच झाले आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणावर बहुजन समाज आहे. मुस्लिम, दलित, माळी, धनगर, कैकाडी, वडारी, कुंभार, तेली, कोल्हाटी, पारधी, जैन मारवाडी, वाणी, वेदु, धनगर, मांगगारूडी, न्हावी असा मोठ्या प्रमाणावर समाज आहे. आजपर्यंत या बहुजन समाजाने जामखेडचे नेतृत्व केले आहे. आणी आता या सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन तिसरी आघाडी करण्याचा निर्धार माजी सरपंच प्रा. कैलास माने यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. यामुळे जामखेड नगरपरिषदेत मोठी रंगत निर्माण होणार आहे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here