शेतकऱ्यांसाठी खूशखबर !!! नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा होणार – अजित पवार

0
279
जामखेड न्युज – – – – – 
राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे अनुदान (Grant up to Rs. 50,000 to farmers) देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी घोषणा केली. दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी ११ मे पर्यंत देण्याचे सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत (Mahatma Phule Shetkari Sanman Yojana) नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची  घोषणा करतानाच  यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.
कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ३ हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचा दावा केला. तसेच हे वर्ष ‘‘महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष’’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना पवार यांनी महिला शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्के तरतूद वाढवून ५० टक्के करण्यात येईल. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या नियमित कर्जदारांनाच हा लाभ मिळू शकतो, असे बोलले जात आहे.
४१ हजार ५५ कोटी रुपये कर्जाचे वाटप
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी  अखेर ४१ हजार ५५ कोटी रुपये कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत ९११ कोटी रुपयांचा उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सुमारे ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगतानाच पवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here