पुण्यात पहिली इंटरसिटी ई-बस सेवेत दाखल, १ जूनपासून पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार पहिली बस

0
230
जामखेड न्युज – – – 
ग्रीनसेल मोबिलिटी या इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे शहरात महाराष्ट्र रिजनल स्टेट ट्रान्सपोर्टसाठी (एमएसआरटीसी) पहिली इंटरसिटी ई-बस धावणार आहे. एमएसआरटीसीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी १ जूनपासून पुणे-अहमदनगर मार्गावर धावणार आहेत. या इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ या नावाने राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.ग्रीनसेल मोबिलिटीतर्फे राज्यातील विविध शहरांमध्ये एमएसआरटीसीसाठी अशा प्रकारच्या ५० इलेक्ट्रिक बस इंटरसिटी प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
                            ADVERTISEMENT
 
राज्यात बारा मीटर बससह ‘हरित मार्ग’ तयार केले जाणार असून १० बस पुणे आणि औरंगाबाद मार्गावर, पुणे-अहमदनगर, पुणे-कोल्हापूर मार्गावर १२ बस, पुणे-नाशिक दरम्यान १८ बस, तर १० बस पुणे-सोलापूर मार्गावर धावतील. एका चार्जमध्ये २५० किमी धावण्याची या बसची क्षमता आहे.या ई-बसच्या मदतीने राज्यात हरित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सुविधांना चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी एमएसआरटीसीला सहकार्य करताना आम्हाला आनंद होत असून प्रवाशांना प्रवासाचा आरामदायी, सुरक्षित आणि हरित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.- अशोक अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रीनसेल मोबिलिटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here