जामखेड न्युज – – – –
स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा रूग्णालय अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद व डॉ. विखे पाटील मेमोरियल हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, कॅन्सर, किडनी विकार व अवयव प्रत्यारोपन, हृदयरोग विभाग अॅन्जिओग्राफी, बायपास शस्त्रक्रिया, अॅन्जिओप्लास्टी, मुत्रविकार आजार, लहान मुलावरील शस्त्रक्रिया या आजारासंदर्भात जवळच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात तसेच तज्ञ डॉक्टर सल्ला व उपचार मार्गदर्शन जिल्हा रुग्णालय नगर येथे होणार आहे. या आरोग्य शिबीराच्या नियोजनासंदर्भात जामखेड येथील
खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जामखेड पंचायत समितीचे उपसभापती रवी दादा सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, सलीम बागवान, मनोज कुलकर्णी, अॅड प्रवीण सानप, डॉ. अल्ताफ शेख, प्रवीण चोरडिया, वैजीनाथ पाटील, युवराज मुरूमकर, गोरख घनवट, सुरेश जाधव, अभिजित राळेभात, डॉ. महेश मासाळ, शिवकुमार डोंगरे, अर्जुन म्हेत्रे, अशोक महारनवर , प्रा. अरुण वराट, दादा जाधव, मदन गोलेकर, टिल्लू पंजाबी, भास्कर गोपाळघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण वराट यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी मोफत रोग निदान व उपचार शिबीराविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच मनोगतात डॉ. भगवानराव मुरुमकर व रवी सुरवसे यांनी परिसरातील गरजू रूग्णांना या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याविषयी सर्वानी नियोजन करण्याचे आवाहन केले तर आभार अमित चिंतामणी यांनी मानले.
१६ मे ते ११ जून पर्यंत प्राथमिक तपासणी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात होईल तसेच नंतर तज्ञ डॉक्टर सल्ला व उपचार जिल्हा रुग्णालय नगर येथे होईल तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुजय विखे-पाटील संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.