जामखेड न्युज – – – –
कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराला तोंड देत देशासाठी पहाडासारखे उभे असलेले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वर आक्षेपार्ह कविता किंवा विधान करणारी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तरावर जाणारी केतकी चितळे या माथेफिरू महिलेने समाज भावना भडकवण्याचे काम केला आहे .जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा संत साहित्याच्या भाषेचा गैरवापर करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते व समाजसेवक व पवार साहेबांना मानणारी गोरगरीब जनता यांच्यामध्ये नाराजीची व संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

तिच्या पोस्टमुळे ब्राह्मण व इतर समाज यांच्यामध्ये द्वेष, तिरस्कार,तेढ व वैमनस्य निर्माण होण्यास होण्यासाठी जाणीपूर्वक ही पोस्ट केले आहे. पोस्ट करणारी ही महिला विकृत चाळे करून जगणारी आहे की तिचे मागे कोणी माथेफिरू आहे याचा तपास करण्यासाठी तिच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा ही विनंती.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, संजय वराट, राजेंद्र पवार, उमर कुरेशी, वैजनाथ पोले,अमित जाधव राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे,चंद्रशेखर नरसाळे, इस्माईल सय्यद,प्रा. राहुल आहिरे, निखिल घायतडक, प्रकाश सदाफुले, देविदास बादलकर ,आदेश सरोदे ,जुबेर शेख, राहुल उगले, प्रदीप राळेभात ,अनील रेडे, बाबासाहेब मगर, रोहन पवार ,योगेश पवार, प्रवीण उगले, जुबेर शेख, संजय डोके ,दिगंबर चव्हाण ,भाऊसाहेब कचरे ,महेंद्र राळेभात, हरिभाऊ बेलेकर, हर्षल डोके, जावेद शेख आदी उपस्थित होते.