जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
दोन दिवसांत व्याजासह मूद्दल द्या नाहीतर तुम्हाला जीवे ठारू मारू अशी धमकी दिली तसेच अपहण करून ठाबुन ठेवुन जमीन लिहून घेतली. या प्रकरणी सावकार पती पत्नी विरोधात अपहण, सावकारी, मारहाणीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्राकंडुन मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वैशाली नंदू सुतार (रा आयकाँन सिटी जामखेड) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आम्ही मजुरी करून जीवन जगत आहे. सुमारे सहा महिन्यांपुर्वी खाजगी सावकार सुंदर काळे रा.जामखेड यांचेकडून जागरण गोंधळासाठी १३०,०००रूपये २० टक्के याजदराने घेतले होते. आजपर्यंत ६० हजार रूपये दिले आहेत. एक महिन्यापूर्वी रात्री १० वा.चे सुमारास सुंदर काळे व त्याची पत्नी शोभा काळे आमचे राहते घरात घुसून आम्हाला घरातून बळजबरीने बाहेर काढून रिक्षामध्ये घेवून गेले.
बैलबाजार येथील राहते घरामधील एका खोलीत डाबुन ठेवले. दुसर्या दिवशी सकाळी ११ वा कोर्टाजवळ आणुन वकीलाकडून आम्हा पती पत्नीकडून आमच्या मालकीच्या जमीनीचे बळजबरीने नोटरी करून घेतले. नंतर आठ दिवसांनी व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी सुंदर काळे व शोभा काळे या दोघांनी सकाळी ६ वा.चे सुमारास आमचे राहते घरात घुसून मला तसेच माझे पतीला लाकडी काठीने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. वैशाली नंदू सुतार यांच्या फिर्यादीनुसार सुंदर काळे व शोभा काळे यांच्या विरोधात सावकारी, अपहरण, मारहाणीचा गून्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.



