आई वडिलांच्या हस्ते गोशाळेत चारा वाटप करून डॉ. भरत दारकुंडे यांनी केली समर्थ हाॅस्पिटल मध्ये आरोग्य सेवेची सुरूवात

0
228
जामखेड न्युज – – – – 
   जामखेड शहरात समर्थ हाॅस्पिटल हे डॉ. भरत दारकुंडे यांनी रूग्णसेवेसाठी सुरू केले आहे. आरोग्य सेवेची सुरूवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलीत श्री साकेश्वर गो शाळा साकत येथील गो मातांना आपल्या आई वडिलांच्या हस्ते हिरवा चारा वाटप करून करण्यात आली आहे याबद्दल डॉ. दारकुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
“गो सेवा परमो धर्म” या पंक्तीप्रमाणे आपन या पवित्र भारत देशाच्या मातीत हिंदु म्हणून जन्म घेतल्यानंतर प्रत्येक हिंदुनी भारत माता, गो माता व आपल्याला जन्म देणारी आपली आई (माता) यांचे ऋण फडणे हे आपले अद्या कर्तव्य असते व असे संस्कार आपल्या पाल्यावर प्रत्येक आई वडील करत असतात. हेच संस्कार झाल्याने आपल्या जामखेड शहरात नव्याने सुरू झालेल्या समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे सर यांच्याकडून अनुभव आला.
जामखेड शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या समर्थ हॉस्पिटलच्या ऊद्घाटनाचे औचित्य साधुन हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे सर यांनी आपले अद्या कर्तव्य समजुन आपल्या नविन व्यवसायाची सुरवात करण्यापुर्वी देव, देश व धर्मची सेवा करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलीत श्री साकेश्वर गो शाळा साकत येथील गो मातांना आपल्या आई वडिलांच्या हस्ते हिरवा चारा देऊन परम पवित्र गो मातांचा आशीर्वाद घेतला. आपन आपल्या धर्माचे, या पवित्र भारत भुमिचे काही तरी देणे लागतो कितीही शिकलो, कितीही मोठे झालो तरी आपली नाळ ही आपल्या हिंदु संस्कृतीशी जोडली गेलेली पाहीजे हेच संस्कार डॉ. भरत दारकुंडे सरांवर त्याच्या माता पित्यांकडुन झालेले असल्याने डॉ. भरत डारकुंडे सर येत्या काळात डॉ. बनुन व्यावसाय करण्यापेक्षा गोर गरीबांची सेवा करावी  या उद्देशाने च समर्थ हॉस्पिटल या दालनाचा शुभारंभ संपन्न झाला.
या वेळी पांडुराजे यांनी डॉ. भरत दारकुंडे सरांचे अभिनंदन केले वेळोवेळी समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे सर हे गो शाळेला मदत करत असतात. देव, देश व धर्माच्या कार्यात डॉ. भरत दारकुंडे सर हे नेहमी पाठीशी ऊभे राहतात त्यांच्या या उपक्रमाने इतरांना प्रेरणा मिळते तसेच सर्वांनी आपला वाढदिवस किंवा इतर काही कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून या गो मातांना चारा देऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांनी यावेळी केले.
या चारा वाटपाच्या पवित्र प्रसंगी यावेळी डॉ. भरत दारकुंडे, त्यांचे माता पिता, पांडुरंग भोसले, नाना खंडागळे, दिपक भोरे, या सर्वांनी उपस्थित राहून गो मातांचा आशीर्वाद घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here