जामखेड न्युज – – – –
जामखेड व पंचक्रोशीत डॉ. निखिल वारे यांचा निश्चितच नावलौकिक होईल कारण त्यांची हिंमत वाखाणण्याजोगी आहे. मी माझ्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच फिजिओथेरपी हाॅस्पिटलचे उद्घाटन करत आहे. असे मत खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी डॉ. निखिल वारे यांच्या एक्टीव लाईफ अॅडव्हान्स फिजिओथेरपी व्लिनीकच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
जामखेड मध्ये एक्टीव लाईफ अॅडव्हान्स फिजिओथेरपी व्लिनीकचे मोठ्या उत्साहात उद्घाटन खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रताप गायकवाड होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर,
पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, प्रा. अरुण वराट, सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी, गोरख घनवट,
सुभाष जायभाय, विनोद नवले पाटील, अरूण म्हस्के, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, करण ढवळे, डॉ. सुनिल वराट, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष कैलास वराट, राजू वराट, पोलीस पाटील महादेव वराट, हरीभाऊ वराट, महादेव वराट, राजाभाऊ वराट, रामहरी वराट, अॅड प्रवीण सानप, प्रा. श्रीराम मुरुमकर, प्रा. गणेश वारे, रामहरी तावरे, प्रा. विकास वराट, शहादेव वराट, नामदेव कसरे, अॅड उत्तम जाधव, प्रभाकर वराट, पोपट वराट, काकडे सर, माजी सरपंच कांतीलाल वराट, गणेश वराट, भरत लहाने, काकासाहेब नेटके, अभय पवार, दादासाहेब वराट, रामेश्वर अॅग्रोचे उदय शिंदे, रत्नापूरचे सरपंच दादासाहेब वारे, निशिकांत वराट, उपसरपंच दिपक नेटके, बाबा महाराज मुरुमकर, भास्कर वराट, अॅड शिवप्रसाद पाटील, अॅड आबासाहेब मुरुमकर, महादेव मुरुमकर, भरत शिंदे, सदाशिव वराट, बाळासाहेब सानप नागरगोजे सर, बिभिषण वराट, लकुळ वराट, संतोष वराट, संपत बोरा, सुनील वारे, पोपट वराट, अशोक पवार यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, आता राजकीय वळवळ करणार्या लोकांना आता येथे करंट देण्याची सोय झाली आहे. असा टोला पक्ष सोडणाऱ्या लोकांना लगावला. तसेच जामखेड परिसरात विविध विकास कामे सुरु आहेत. प्रा. राम शिंदे व मी प्रयत्न करत जामखेड शहराबाहेरून जाणारा बायपास रद्द करत शहरातूनच रस्ता ठेवला पुढील महिन्यात जामखेड सौताडा रस्ता कामाला सुरुवात होईल असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
या क्लिनीक मध्ये उपलब्ध सुविधा मनक्याचे विकार, हाडांचे विकार, सांधे दुखी, स्पोर्ट इंज्युरी, मेंदुचे विकार, अर्धांगवायू पुनर्वसन, लहान मुलांमधील अपंगत्व पुनर्वसन, लिगामेंंट इंज्युरी, टाचेचे दुखणे, मनक्याची चकती सरकणे, हात पायास मुंग्या येणे, कंबर दुखी, संधीवात, गुडघे दुखी, वृध्दांसाठी फिजिओथेरपी, खांदे दुखी (फ्रोजन शोल्डर), कोपर दुखी (टेनिस एल्बो), मान दुखी, चेहर्याचा लकवा, सांधे बदलल्यानंतरचे व्यायाम, फ्रॅक्चर ( प्लास्टर काढल्यानंतरचे व्यायाम) अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत. क्लिनिकचे ठिकाण आर. के. कलेक्शन, रामेश्वर मेडिकल शेजारी बीड रोड जामखेड