जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
आजची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यातून बाहेर पडून कुस्ती व जीमवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्याला पदक हवे असेल तर मेहनत महत्त्वाची आहे. मेहनत व सराव केला तर यश नक्कीच मिळते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व अर्जुनवीर पुरस्कार सन्मानित काकासाहेब पवार यांनी व्यक्त केले.
जामखेड येथे लोकसहभागातून सारोळा रोड वर साकारलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जिमखाना शुभारंभ दि ३० रोजी सायंकाळी शस्त्रास्त्रांचे पुजन, सत्कार समारंभ व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष काकासाहेब पवार बोलत होते. या वेळी अशोक डोंगरे, पृथ्वीराज पाटील, विशाल बनकर, सिकंदर शेख, आशोक शेठ डोंगरे, रमेश शेठ गुगळे , शंभुराजे कुस्ती संकुलचे संचालक मंगेश आजबे, डॉ. प्रशांत गायकवाड , सुनील उबाळे , मकरंद काशिद , कृष्णाराजे चव्हाण , दादाराजे भोसले , बाळासाहेब ठाकरे , पवार साहेब , डॉ खोत सरपंच तरडगाव , केसकर आबा , काका चव्हाण , डॉ हजारे , मनोज कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, राहुल पवार, आबा घुमरे, बंडु मुळे, मंगेश मुळे, योगेश मुळे, बालाजी जरे, कृष्णा डुचे यांच्या सह अनेक मल्ल व शेतकरी बांधव तसेच तरूण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आगोदर जामखेड शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती . यात मोठय़ा संख्येने युवा वर्ग व नागरीक सहभागी झाले होते .
यावेळी बोलताना अशोक डोंगरे म्हणाले की , गावा – गावात चावडी आहे पण तालीम नाही गाव तेथे तालीम अवश्यक आहे हे अभियान झाले पाहिजे . जामखेड शहर नागपंचमी ही नाचगाण्यासाठी प्रसिद्ध होती . आता तालमीमुळे जामखेड शहराची ओळख हगाम्याचे वेगवेगळे फड गाजवणारे मल्ल म्हणून होऊ लागली आहे. आपण जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत पण आलपिक पदकात दुसरा क्रमांक येत नाही हे आपले दुर्दैव आहे.
उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की , पैशांपेक्षा शरिरसंपत्ती महत्त्वाची आहे . सुदृढ शरिरयष्टी आवश्यक आहे . त्यामुळे तरुणांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे .
यावेळी शंभुराजे कुस्ती संकुल व स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखान्याचे आयोजक मंगेश ( दादा ) आजबे म्हणाले की , जामखेड परिसरातील गोरगरीब मुलांना जिमची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने आम्ही स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा नावाने जिमखाना व कुस्तीच्या मॅटची सोय केली आहे. अशी सोय करणे तालुक्यातील सर्व पैलवान मुलांना अतिशय गरजेची होती कारण कुस्ती स्पर्धा मध्ये मुलांना मॅटची सवय नसेल कारणाने आपली ग्रामीण भागातील पैलवान मुले चांगले कौशल्य असूनही शैक्षणिक किंवा इतर कुस्ती स्पर्धा मध्ये मागे राहत होती पण आता या जिमखाना मुळे पैलवानांना या सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत . गेल्या तीन वर्षांपासून तालीम मध्ये गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना सर्व काही मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहोत .





