शेतकऱ्यांना बॅंकेत कोणतीही अडचण येऊ देणार नाही – अमोल राळेभात

0
538
जामखेड प्रतिनिधी
आपला देश कृषिप्रधान आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. बॅकेसंदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी मी नेहमी शेतकऱ्यांबरोबर राहुन अडचणी सोडविल्या जातील  असे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक आमोल राळेभात यांनी सांगितले.
नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल अमोल राळेभात यांचा सत्कार साकत मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बिनविरोध निवडुन आण्यासाठी माझे वडील जगन्नाथ ( तात्या ) राळेभात बंधु सुधीर (दादा )राळेभात यांची प्रमुख भुमिका होती माझी उमेदवारी ठेवून नवा संकल्प घडवला हा सर्व शेतकरी सभासदामुळे  मान मिळाला आहे शेतकऱ्यांना बँकेत कोणतीही अडचण येऊ देणार नाही मी आपल्यासाठी सदैव हजर आहे. मी सदैव शेतकरी हितासाठी काम करेल असे राळेभात यांनी सांगितले.
      साकत मध्ये बाळासाहेब वराट यांनी  कार्याक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुधीर (दादा ) राळेभात  होते यावेळी  विशाल नेटके, बाळासाहेब वराट ,पोपट वराट,  नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर, नागेश वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरूमकर, हनुमंत पाटील,  व्हाईस चेअरमन प्रमोद मुरूमकर , महादेव वराट पाटील, रामभाऊ मुरूमकर, सोमा वराट, सोनु वराट,  राजू मुरूमकर ,सचिन मुरूमकर, धनु वराट , डॉ. प्रशांत मुरूमकर,  साहेबराव कडभने  साकत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था साकत चे सचिव दादासाहेब मेंडकर
सह अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here