लवकरात लवकर नदीकाठच्या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येईल – आमदार रोहित पवार

0
284
जामखेड प्रतिनिधी
नदी हि माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान असते. हे ठिकाण शहराजवळ असेल तर ते स्वच्छ व सुंदर असावे असे सर्वाना वाटते. यातुनच नदीचे सुशोभीकरण करून काठावर भगवान शंकराची मुर्ती बसविण्यात आली आहे. लवकरात लवकर नदीकाठावरील मंदीराचे सुशोभीकरण करण्यात येईल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
    शहरातील विंचरणा नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. नदीकाठावर भगवान शंकराची भव्य दिव्य अशी मुर्ती बसविलेली आहे त्याची महापुजा आज आमदार रोहित पवार यांच्या समवेत पंचवीस जोड्या पुजेसाठी बसलेल्या होत्या. पांडुरंग शास्त्री देशमुख देवा यांच्यासह अनेक वैदिक ब्राम्हणाच्या हस्ते आज पुजा करण्यात आली यावेळी आमदार रोहित पवार यांचे पिताश्री राजेंद्र पवार मातोश्री सुनंदाताई पवार, प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, राजेंद्र कोठारी, विजय कोठारी, चंद्रकांत राळेभात, राजू गोरे, विकी घायतडक, दिंगाबर चव्हाण, लक्ष्मण ढेपे, अमोल लोहकरे, अमित जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सुरुवातीला नदी म्हणजे फक्त पात्रच होते. एक मोठी गटार झालेली होती वेड्या बाभळी वेगवेगळ्या वेळी यांनी वेढलेली होती पण नदी हे प्रेरणास्थान आहे. आता नदीच्या दोन्ही बाजूला रोड असावेत लहान मुलांना तेथे सायकल खेळता यावी, लोकांना सकाळी फिरता यावे यासाठी रोडचा प्रस्ताव शासन दरबारी आहे तो लवकरच मंजूर होईल. शहराच्या नियोजनासाठी सर्वजण झटतात. मुर्ती बसवताना सर्वाचे सहकार्य लाभले आहे असेही पवार म्हणाले.
     यावेळी बोलताना पांडुरंग शास्त्री देशमुख म्हणाले की, जामखेड शहरात प्रवेश करताना नदी काठावर उजव्या बाजूला भगवान शंकराची मुर्ती असणे हे सुलक्षण आहे. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते खुप चांगले कामे होणार आहेत.
    यावेळी बोलताना जगप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे म्हणाले की,  १९७६ साली मी नगरपासून मैलाचे दगड बसवण्याचे काम केले ते जामखेड विंचरणा नदीपर्यत व आज ४५ वर्षानी जेथे काम संपले तेथेच भगवान शंकराची मुर्ती बसवण्यात आली आहे त्या मुर्तीचे काम माझ्या हस्ते झाले हे माझे परमभाग्य आहे असे कांबळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here