जामखेड न्युज – – – – –
तामिळनाडूमधून (Tamil Nadu) एक वेगळीच बातमी समोर येतेय. तामिळनाडूच्या तंजावर (Thanjavur district) जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या 12 वर्षांच्या मुलावर 17 वर्षांच्या मुलीला गर्भवती केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी या दोघांचे प्रेमसंबंध होते, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा मिरसुदार शासकीय रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मुलीचे काही वर्षांपासून एका 12 वर्षांच्या मुलासोबत संबंध असल्याचं समोर आलं. यामुळे मुलगी गरोदर राहिली आणि त्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला पॉस्को कायद्यानुसार अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला तंजावर बाल सुधारगृहात पाठवले आहे. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.
पॉस्को कायदा काय आहे?
पॉस्को कायद्यानुसार, 18 वर्षांखालील मुलांसोबत कोणत्याही प्रकारचे लैंगिक वर्तन पॉस्को कायद्याच्या कक्षेत येते. पोस्को कायदा मुलगा आणि मुलगी दोघांनाही शारीरिक शोषणापासून समान संरक्षण देतो. पॉस्को कायद्यांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी विशेष न्यायालयात केली जाते. पॉस्को कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी मुलाच्या पालकांच्या किंवा ज्यांच्यावर त्याचा विश्वास आहे त्यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्यासमोर होते.
पॉस्को कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे. या सगळ्याशिवाय पॉस्को कायद्यात आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे लैंगिक शोषणाची घटना घडल्यानंतर एक वर्षाच्या आत खटला पूर्ण व्हायला हवा, अशी कायद्यात तरतूद आहे. याशिवाय एखाद्या अल्पवयीन मुलासोबत त्याच्या इच्छेनेही शारीरिक संबंध ठेवले असतील तर त्यालाही बलात्काराच्या श्रेणीत ठेवले जाते.