जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील जनरलस्टोअर व्यवसायिक स्व. आशालता रामलिंग वराडे वय 64 यांचे दि 1 मे 2021 रोजी दुखःत निधन झाले. त्याच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्ताने नगर रोड वरील ब्रम्हनाथ सेवा प्रसार मंडळांचे मुकबधिर शाळा येथील विद्यार्थ्यांना मिठाई व फळे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी पत्रकार लियाकत शेख यांनी सांगितले की, जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मधील काळास जीवन असे म्हणतात. या जीवनात मनुष्य चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. चांगले कर्म केले तर मृत्यू नंतर ही त्यांच्या कर्माचे गौरव होते. म्हणून जीवनात चांगले कर्म करावे. आशालता वराडे यांनी जीवनात चांगलेच कार्य केले म्हणून आज त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्ताने येथील विद्यार्थ्यांना फळे मिठाईचे वाटप करण्यात आले. त्या स्वतः या शाळेला मदत करीत होत्या, सामाजिक व घार्मिक कार्यात त्या आपले योगदान करत होत्या पण आचानक काळाने झडप घातली आणि त्या आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना असे व्यक्त होत प्रकाश खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.
सदर कार्यक्रमांस जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, ओंकार दळवी, अविनाश बोधले, पप्पुभाई सय्यद, समीर भाई शेख, लियाकत भाई शेख , होते मुख्याध्यापक गणेश गर्जे, अनिल दहिफळे, नारायण वायभसे, संतोष अडसुळ, रमेश महिम आदी कर्मचारी उपास्थित होते. यावेळी वैभव बोरूडे या मुकबधिर मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या नंतर उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून स्व आशालता वराडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.