जामखेड प्रतिनिधी
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी विंचरणा व धाकली नदीचे सुशोभीकरण करून विंचरणा नदीपात्राच्या कडेला भव्य दिव्य भगवान शंकराची 21 फुटी उंची असलेली मुर्ती बसवून आज ग्रामस्थांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली उद्या आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुजा होत आहे. जामखेड शहरात मोठा बदल होत असुन एक पर्यटन केंद्र होत आहे.
जामखेड मधील गटारगंगा ठरवलेल्या विंचरणा व धाकली नदी म्हणजे वेड्या बाभळी, वेगवेगळ्या वेली, गटाराचे पाणी सर्वत्र दुर्गंधी यामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण झाली होती ही गोष्ट आमदार रोहित पवार यांच्या लक्षात आली त्यांनी नदी सुशोभीकरणाचे काम हाती घेतले नदी स्वच्छ करून एक पर्यटक स्थळ निर्माण करण्यासाठी नदी पात्रात भव्य दिव्य अशी भगवान शंकराची 21 फुट उंच मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दि. 15 रोजी संपन्न होत आहे यामुळे जामखेड शहराच्या वैभवात मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे.
विंचरणा नदीपात्रात ग्रामदैवत नागेश्वराच्या धर्तीवर भव्य दिव्य अशी शंकराची मुर्ती नगरचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी सहा महिने मेहनत घेऊन हि मुर्ती बनवली आहे.
आगोदर जामखेड शहरात प्रवेश करताच पश्चिमेच्या बाजुने विंचरणा नदी व दक्षिणेला धाकली नदी आहे. अनेक वर्षांपासून शहरातील सांडपाणी या नद्यात सोडले जात होते. त्यामुळे नद्यांना गटाराचे स्वरूप आले होते. या नद्यांमध्ये वेड्या बाभळी, वेगवेगळ्या वेली गवत यांनी नदी व्यापली होती. या आगोदरही नदी सुशोभीकरण करण्याचे नगरपरिषदेचे कागदोपत्री काम झालेले आहे. फक्त मलमपट्टी करून लाखो रुपयांची बील उचलली आहेत.
आमदार रोहित पवार यांनी या गटारगंगा झालेल्या दोन्ही नद्यांचे सुशोभीकरण करून शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात कोठेही बाग नाही याची उणीव नदीच्या परिसरात बाग तयार करण्यात येणार आहे. तसेच नदीच्या दोन्ही बाजूला मोठे भराव टाकून नागरिकांना येण्याजाण्यासाठी रस्ता तसेच कडेने वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणी पेव्हिंग ब्लाॅकही बसविण्यात येणार आहेत. नदी सुशोभीकरण करण्यासाठी व जामखेड शहराला स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या पाच शहरात जामखेडचा नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नदी सुशोभीकरण करण्यात आले आहे.
दि. 14 रोजी ग्रामस्थांच्या हस्ते ब्राह्मणाच्या वेद मंत्राने पुजा संपन्न झाली तर 15 रोजी नदीच्या पात्रात भव्य दिव्य अशी भगवान शंकराची 21 फुटी उंची असलेली मुर्ती प्रतिष्ठापना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होत आहे. यामुळे जामखेड शहरातील नागरिकांना सहकुटुंब फिरण्यासाठी एक पर्यटन केंद्र नदी परिसरात निर्माण होत आहे.