जामखेड प्रतिनिधी
जामखेड परिसरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे
तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून शहरात सेव्हन फिटनेस क्लब सुरू करण्यात येणार आहे. उद्या त्याचे भव्य उद्घाटन होत आहे.
सुमित रमेश वराट यांनी सेव्हन फिटनेस क्लब सुरू केला आहे उद्या दि. १५ रोजी ११.५५ वाजता उद्घाटन होत आहे. मतदारसंघाचे आमदार रोहित ( दादा ) पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे व आमदार सुरेश आण्णा धस हे राहणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आमदार अरुण (काका) जगताप, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण संग्राम चौघुले मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिव्हर्स हे आहेत.
कार्यक्रमासाठी परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून रमेश वराट (दाजी), सुमित (दादा) वराट, बबन ( मामा) धनवडे, आप्पासाहेब कार्ले, बिभिषण (मामा) धनवडे, गणेश ( भाऊ) कार्ले, शुभम धनवडे, शिवराज धनवडे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण नवीन पंचायत समिती समोर सेंट्रल कॉम्प्लेक्स जामखेड हे आहे.