जिल्हा बॅकेसाठी बिनविरोध निवड झालेले सर्वाधिक तरूण संचालक अमोल राळेभात

0
232

जामखेड प्रतिनिधी

  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड सोसायटी मतदारसंघातून अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा बॅकेचा सर्वाधिक तरूण संचालक होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. वडिल जगन्नाथ ( तात्या) राळेभात यांनी माघार घेतल्याने अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे. वडिल जगन्नाथ (तात्या) राळेभात हे पहिल्या वेळी बिनविरोध संचालक झाले होते व आता मुलगा अमोल राळेभातही पहिल्या वेळी बिनविरोध संचालक झाल्याने जामखेडच्या इतिहासात वडिलानंतर मुलगा संचालक होण्याची पहिलीच घटना आहे. तेही बिनविरोध.
     जामखेड सोसायटी मतदारसंघात राळेभात यांचे गेल्या पाच पंचवार्षिक पासून वर्चस्व आहे. एकहाती सत्ता त्यांच्याकडे आहे. जगन्नाथ  ( तात्या ) राळेभात हे पहिल्या वेळी बिनविरोध संचालक झाले होते. आता त्यांचा मुलगा अमोल राळेभात हेही बिनविरोध संचालक झाले आहेत त्यामुळे हा योगायोगच आहे. तसेच सर्वात तरूण संचालक होण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे.
    जामखेड सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात, अमोल राळेभात व सुरेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात सुरेश भोसले यांनी माघार घेतली त्यामुळे राळेभात पिता पुत्र यापैकी एक संचालक होणार हे निश्चित होते. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जगन्नाथ (तात्या) राळेभात  यांनी माघार घेतली व अमोल राळेभात बिनविरोध संचालक झाले.
     जामखेड तालुक्यात एकुण 47 मतदार आहेत. यातील बहुसंख्य मतदार हे राळेभात यांच्या बरोबर होते. बिनविरोध निवडी बद्दल जामखेड न्युजशी बोलताना अमोल राळेभात म्हणाले की, आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय (दादा) विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे,
माजी मंत्री प्रा. राम शिंदे, या मतदारसंघाचे आमदार रोहित
(दादा) पवार व सर्व मतदार यांच्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली आहे.
      बिनविरोध निवडीमुळे जिल्हा बॅकेचा सर्वाधिक तरूण संचालक होण्याचा मान अमोल राळेभात यांनी मिळविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here