Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या रंगेल किर्तनकाराला अखेर पोलिसांकडून अटक

रंगेल किर्तनकाराला अखेर पोलिसांकडून अटक

0
258
जामखेड न्युज – – – – 
गंगापूर तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. आज (दि.१९) अखेर या रंगेल महाराजाला शिल्लेगाव पोलीसांनी सकाळी ११ वाजता अटक केली. दुपारी गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महाराजास जामीन मंजूर केला.
गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!