मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याने सदावर्ते विरोधात बीडमध्ये गुन्हा

0
208
जामखेड न्युज – – – – – 
 मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर १७ एप्रिल रोजी येथील शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार, १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते स्वराज्यनगर येथे घरी होते. यावेळी एका डॉक्टरांनी व्हॉटसअपवर पाठविलेला व्हिडिओ त्यांनी डाऊनलोड करुन पाहिला. त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले.मराठा आरक्षण हे मोगलाई पध्दतीने लुटले जाऊ शकत नाही. पाटीलकी, देशमुखी, राजेशाहीचे राज्य नाही. महागड्या गाड्या आणून लोक जमवले व ५२ मोर्चे काढले. मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही. अखेर सुप्रिम कोर्टाने ँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केले. याशिवाय दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲड. सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अवमान करुन भीती पसरविल्याचा ठपका ठेऊन कलम १५३ (ए), २९५ (ए), ५०५ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सपोनि अमोल गुरले करत आहेत.
सदावर्तेंचे पाय खोलात
मुंबईत खा. शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. याप्रकरणी एसटी महामंडळ कर्मचाऱ्रूयांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक झाली होती. त्यानंतर सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ताबा घेतला. दीड वर्षांपूर्वी खा.उदयनराजे भोसले व खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात सदावर्ते यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. १६ एप्रिल रोजी त्यांना सातारा न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पाठोपाठ बीडमध्येही गुन्हा नोंद झाल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here