जामखेड प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त शंभुराजे कुस्ती संकुल आयोजित भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शुक्रवारी जामखेड मध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रथम कुस्ती पै. माऊली जमदाडे ( महान भारत केसरी) विरूद्ध पै. बालारफीक शेख ( महाराष्ट्र केसरी) यांच्यात एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची होणार आहे. तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. सागर मोहळकर (साकेश्वर केसरी) विरूद्ध पै. संग्राम पाटील ( सेनादल पुणे) यांच्यात एक लाख रुपयांची होत आहे. तर तृतीय क्रमांकाची कुस्ती बापू जरे ( साकेश्वर केसरी) विरूद्ध अक्षय डुबे ( पुणे) यांच्यात पंच्याहत्तर हजार रुपयांची होणार आहे या भव्य हगाम्याचा आनंद परिसरातील कुस्ती शोकिनांनी घ्यावा असे आवाहन हगाम्याचे आयोजक मंगेश (दादा) आजबे व पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पवार असणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्रा. राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, निलेशभाऊ (भाऊ) गायवळ, युवराज (भाऊ) काशिद, सुंदरदास बिरंगळ, डॉ. रवी आरोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, उद्योगपती रमेश गुगळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता संजय कांबळे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्यासह सचिन गायवळ सर, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, मोहन पवार, राहुल पवार, गोरख घनवट, बिभिषण धनवडे, आप्पासाहेब कार्ले, विनोद मुळे, सोमनाथ तनपुरे, हिंदुराज मुळे, राजेंद्र देशपांडे, बजरंग मुळे, संजय कार्ले, सुनील लोंढे, रमेश (दादा) आजबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने पंढरपूर, प्रा. जाकीर शेख, प्रदिप बहिर हे राहणार आहेत.
या हगाम्यातील कुस्ती सोडवली जाणार नाही, पंचाचा निर्णय अंतिम राहिल कुस्त्या नेमण्याची वेळ सकाळी 11 ते 01 वाजेपर्यंत राहिल या नंतर आलेल्या कुस्त्या लावल्या जाणार नाहीत. कुस्ती लावण्यासाठी संपर्क पै. शरद कार्ले फोन नंबर 9689815555, पै. बालाजी जरे फोन नंबर 9767879046, श्रीधर मुळे फोन नंबर 7020681910 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक स्वाभिमानी शेतकरी पक्ष कार्यालयापासून निघेल व ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात हगामा होईल.
या हगाम्यासाठी प्रविण घुले, बबन (काका) काशीद, आस्लम काझी, सुनील सावंत, बाळासाहेब आवारे, परमवीर पांडुळे, नवनाथ जगताप, बाबुराव भोंडवे, बंडाभाऊ मोडळे, अशोक वाघमोडे, असिफ तांबोळी, ईश्वर तोरडमल, इस्माईल टेलर, सुरेश घुगे, मोतीराम चव्हाण, आलेश जगदाळे, बापु मांडवे, अफसर जाधव, रावसाहेब ढवळे, बाबा महारनवर, नितीन जाधव, महेंद्र धांडे ही वस्ताद मंडळी उपस्थित राहणार आहेत.
मंगेश (दादा) आजबे यांनी शंभुराजे कुस्ती संकुल उभे करून परिसरात मल्ल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी मल्लांना मोफत कुस्ती प्रशिक्षण दिले जाते आता मल्ल होण्यासाठी कोल्हापूर व पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. आज सुमारे शंभर मल्ल या कुस्ती संकुलामध्ये कुस्तीचे धडे गिरवत आहेत. भव्य दिव्य हगाम्याचे हे तिसरे वर्ष आहे.
मंगेश ( दादा) आजबे यांनी कुस्ती संकुलाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमातून आपला ठसा उमटविला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच ते पुढे असतात व शेतकर्यांना न्याय मिळवून देतात. कोरोना काळात कोविड रूग्णांवर मोफत उपचार करणारे आरोळे कोविड सेंटर अडचणीत असताना त्यांनी सुरुवातीला एक महिन्याचा किराणा, धान्य व भाजीपाला मदत केली यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. तसेच संपुर्ण हाॅस्पिटल मधील कर्मचारी वर्गाला कपडे दिले त्यांचे नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात.
गेल्या तीन वर्षांपासून शंभुराजे कुस्ती संकुलामार्फत हगाम्याचे आयोजन करतात तसेच या संकुलात मोफत कुस्ती प्रशिक्षण दिले जाते. तसेच हगाम्यासाठी देशभरातून मल्ल हजेरी लावतात.