जामखेड न्युज – – – –
भूतवडा परिसरात विजेची टंचाई जाणवत होती. जनतेची अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते अनिल (मामा) बाबर, अॅड हर्षल डोके, संजय डोके सह इतर ग्रामस्थांनी सिंगल फेज डीपी मिळावी म्हणून लोकप्रिय आमदार रोहित (दादा) पवार यांच्याकडे मागणी केली होती आमदार साहेबांनी ताबडतोब पांडववस्ती परिसरासाठी सिंगल फेज डीपी मंजूर केली. तिचे आज उद्घाटन करण्यात आले.
कार्यसम्राट आमदार रोहीत दादा पवार यांच्या माध्यमातून भुतवडा पांडववस्ती येथे सिंगल फेज डीपी मंजूर करण्यात आली त्याच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे , प्रा लक्ष्मण ढेपे सर, विजुशेट कोठारी, गावीत साहेब, अनिल (मामा) बाबर, प्रशांत (काका) राळेभात , अॅड. हर्षल डोके, संजय नाना डोके, अशोक डोके, नाना डोके, माऊली डोके, चंदू डोके, कैलास डोके, लहू डोंगरे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
परिसरातील लाईटची अडचण आमदार रोहित (दादा) पवारांच्या माध्यमातून सुटल्याने ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे आभार मानले.