विनाअनुदानित शिक्षकांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आज उपोषणाचा आकरावा दिवस

0
269
जामखेड न्युज – – – – 
   राज्यात शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्प्या टप्प्याने अनुदान घोषणा केली होती पण प्रत्यक्षात मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विनावेतन अनेक शिक्षक काम करत आहेत. यांना न्याय मिळाला म्हणून गजानन लक्ष्मण खैरे हे २ एप्रिल पासून स्मशानभूमी मुकुंदवाडी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे आज आकरावा दिवस आहे.
    पुढीलप्रमाणे मागण्या ठेवण्यात आल्या आहेत
शासनाच्या शासनाच्या निर्णयानुसार अनुदानाचा टप्पा मिळावा, त्रुटी पुर्तता पात्र शाळांची यादी निधीसह घोषित करावी, अघोषित प्राथमिक, माध्यमिक शाळा तुकड्यांना तात्काळ निधीसह घोषित करण्यात यावे, अशत: शिक्षकांना सेवा संरक्षणासह वेतन लागू करणेबाबात तसेच मेडिक्लेम योजना लागू करणे बाबत अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या अकरा दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू आहे.
मागण्याच्या अनुषंगाने २ एप्रिल २०२२ पासुन स्मशानभूमी मुकुंदवाडी, औरंगाबाद येथे बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा
11.वा. दिवस, राज्यातील ६०,००० विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. १५ वर्षापासुन विनावेतन काम करत आहोत सर्वच शासनाने आमची फसवणुक केली आहे.
 १०० टक्के अनुदान व इतर मागण्या बाबत संघटनेच्या व
इतर संघटनेच्या वतीने १६ दिवस अन्नत्याग पायी दिंडी,
 १७ दिवस भिडेवाडा, पुणे येथील अन्नत्याग, उपोषण, आरबी समुद्रात जलसमाधी, मुंबई आमदार निवासावरून उडी मारतांना आतापर्यंत लेखी व तोंडी आश्वासने देऊन आम्हा शिक्षकांवर अन्याय करण्यात आला. जोपर्यंत
सर्व मागण्यांचा कॅबिनेट निर्णय होत नाही तो पर्यंत मी गजानन खैरे बेमुदत अन्नत्याग उपोषणावर ठाम आहे.
माझी तब्येत अगोदरच्या उपोषणामुळे व सुरू असलेल्या
अन्नत्याग उपोषणामुळे खालावली आहे. माझा मृत्यु झाल्यास माझा अंत्यविधी याच स्मशानभुमित माझे अवयव दान करून शासनाने करावा.
मी मेल्यानंतर शासनाने सर्व मागण्या नुसार माझ्या मराठी
शाळेत काम करणाऱ्या १५ वर्षापासून विना वेतन, अल्पवेतनावरील बांधवांना १०० टक्के पगार देऊन माझ्या शरीरास किंवा आत्म्यास श्रध्दांजली द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here