कीर्तनाच्या व्हिडिओसोबत बुवाकडून रासलीलेचाही व्हिडिओ झाला फॉरवर्ड अन्…

0
309
जामखेड न्युज – – – 
बुवाबाजी करणाऱ्या ‘त्या’ दोन बुवांचा आक्षेपार्ह चित्रफितीमुळे राज्यात दोन दिवसांपासून खळबळ उडाली आहे. याबाबत दररोज एक-एक सुरस कथा ऐकावयास मिळत आहे. एका गावातील काही ग्रामस्थांनी बुवाला कीर्तनाचा व्हिडिओ पाठविण्यास सांगितले. परंतु कीर्तनाच्या व्हिडिओसोबत बुवाकडून रासलीलेचाही व्हिडिओ फॉरवर्ड झाला अन् बुवाचे बिंग फुटल्याची चर्चा जनमानसात ऐकावयास मिळत आहे. दरम्यान चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर सहकारी महिला बुवाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. (Aurangabad)
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लासूरगाव परिसरातील कीर्तनकार महिला व पुरूष बुवाचे सूर जुळले. अन् ते दोघे एक होऊन त्यांच्या कामलीलेची चित्रफित दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर अचानक प्रसारीत झाल्यामुळे धार्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता दोन दिवसात ही चित्रफित राज्यात व्हायरल झाली. या कामलीला प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतल्याने आता या प्रकरणाची रंगत आणखी वाढली आहे. देसाई यांनी संबंधित  बुवाचे नाव उघड करून त्याचा समाजासमोर भांडाफोड करणार असल्याचे विधान केले आहे. (Aurangabad)
बुवाच्या पायावर नागरिक माथा टेकवितात. त्यामुळे त्यांच्याकडून असे कृत्य अपेक्षित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोघांची आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन शरीरसंबंधाची अश्लील चित्रफित प्रसारीत करणाऱ्या बुवाविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिल्लेगाव पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु त्यांना प्रकरणात सूर गवसायला तयार नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणाही गलितगात्र झाली आहे. नेमकी कारवाई काय करावी? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे या चित्रफितीबाबत दररोज वेगवेगळ्या सुरस कथा बाहेर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here