जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पोलीस प्रशासन कमी पडले आहे. आता आंदोलनकर्त्यांची डोकी कोणी भडकावली सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करतोय याचा शोध लवकरच घेतला जाईल संपुर्ण महाराष्ट्राला हि घटना योग्य वाटली नाही पण काही भाजपाचे महाभाग टिव्हीवर दिसण्यासाठी मनोविकृतीतून विक्षिप्त वक्तव्य करतात असे मत आमदार रोहित पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना केले.

आज तालुक्यातील नवनियुक्त सेवा संस्थेचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, संचालक अमोल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वराट, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, हळगावचे ज्येष्ठ नेते किसनराव ढवळे, अमोल लोहकरे, कैलास वराट, सुरेश वराट, हनुमंत वराट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांनी विचारलेल्या शरद पवारांच्या घरावरील हल्ला व भाजपाच्या काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य याविषयी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, संपुर्ण महाराष्ट्राला हे योग्य वाटले नाही पण भाजपाचे काही लोक टिव्हीवर दिसण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. आम्हाला शरद पवार साहेबांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे नाहीत भाजपाचे अनिल बोंडे यांचे काय झाले असते हे सांगता येत नाही.
या आंदोलनात कोणाचा हात आहे हे लवकरच बाहेर येईल. सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे. कारण भाजपाने अनेक पुरस्कार सदावर्ते याच्या घरच्याला दिलेले आहेत. करोडो रुपये फी घेतली व एसटी आंदोलन भरकटवले हे आता कर्मचाऱ्यांना कळून चुकले आहे.
गृहखाते कमी पडले का ❓ याविषयी विचारले असता ते म्हणाले की, काही प्रमाणात गृहखात्याचे हे अपयश आहे. पंचावन्न वर्षांत कधीही असा प्रकार घडला नाही. आता आंदोलनकर्ते कोण होते, त्याना कोणी भडकावले, सदावर्ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे लवकरच कळेल असे आमदार रोहित पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले.