जामखेड न्युज – – – –
लसीकरणाच्या बूस्टर डोसची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर येत आहे. कोरोनाबाबत आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.
खासगी केंद्रांवरही सुविधा उपलब्ध
खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.
दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला असावा
एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकाना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात.









