पत्रकार बाळ बोठेचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

0
215
जामखेड न्युज – – – – 
 रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठेपाटील याचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औऱंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीविरूद्ध पुरेसे पुरावे असल्याने त्याला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
या गुन्ह्यात बोठे याला १३ मार्च २०२१ रोजी अटक झाली आहे. तेव्हापासून तो तरुंगात आहे. ३० नोव्हेंबर २०२० रोजी हा गुन्हा घडला होता. यामध्ये जामीन मिळण्यासाठी आरोपीतर्फे गेल्यावर्षी नगरच्या सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटळाळण्यात आल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दीर्घ काळानंतर तेथे या प्रकरणी निकाल आला आहे.
सरकारतर्फे सरकारी वकील डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. तर मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. एन. बी. नरवडे व अ‍ॅड. एस. पटेकर यांनी काम पाहिले. आज या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने आपला निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जरे यांचा ३० नोव्हेंबरला सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता.
हा कट रचून, सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले. पत्रकार बोठे याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न आणि बराच काळ फरारी राहिल्यानंतर अखेर बोठे याला अटक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here