लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या वारसांचा शेतकरी विकास आघाडी मंडळ रिंगणात 

0
213
जामखेड न्युज – – – – 
लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या आशीर्वादाने त्यांचे वारस दत्तात्रय श्रीरंग कोल्हे व दिपक नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळा विविध कार्यकारी सोसायटीसाठी शेतकरी विकास आघाडीचे तेरा उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून त्यांची निशाणी पतंग असून विरोधी मंडळाने लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या नावाचा व फोटोचा कोणी वापर करू नये असे आवाहन शेतकरी विकास आघाडीचे नेते दत्तात्रय कोल्हे व दिपक पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
      शेतकरी विकास आघाडीचे नेते दत्तात्रय श्रीरंग कोल्हे व दिपक पाटील यांनी जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीसाठी तेरा उमेदवार जाहीर केले आहे. कर्जदार मतदार संघातून नवनाथ पोपट बारस्कर, राजेंद्र रामचंद्र हजारे, अविनाश काकासाहेब लेकुरवाळे, काशिनाथ गहीनीनाथ मते, चंद्रहार किसन पागीरे, अरूण नामदेव रोडे, कैलास महादेव वाळुंजकर, शहाजी संभाजी वाळुंजकर (पवार), अनुसूचित जाती जमाती मधुन रूपचंद तुकाराम आव्हाड, महिला मतदार संघातून सौ. आयोध्या रामलिंग हजारे, सौ. सायरा सत्तार शेख, इतर मागासवर्गीय मतदार संघातून शिवाजी तुकाराम कोल्हे, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून मच्छिंद्र मारूती सुळ असे तेरा उमेदवार जाहीर करून त्यांची निशाणी पतंग असल्याचे जाहीर केले आहे.
     दिपक पाटील व दत्तात्रय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडी मंडळ निवडणूक लढवित असून या मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, आर. डी. पवार, चेअरमन आजीनाथ हजारे यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पॅनेलने लोकनेते स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदीप आबा पाटील यांच्या नावाचा व फोटोचा वापर न करण्याचे आवाहन दत्तात्रय कोल्हे व दिपक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here