दिल्लीत रंगले स्नेहभोजन पवारांच्या घरी गडकरी तर दानवेच्या कार्यक्रमास रोहित पवारांची हजेरी

0
278
जामखेड न्युज – – – – 
ईडीने शिवसेना खासदार संजय राऊतांवर (ED Action on Sanjay Raut) कारवाई केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी भाजपवर आऱोप केले आहेत. या सर्व घडामोडीदरम्यान दिल्लीत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. पवारांच्या (Sharad Pawar) घरी आयोजित कार्यक्रमात संजय राऊतांसह भाजपचे नितीन गडकरींनीही (Nitin Gadkari Meet Sharad Pawar) उपस्थित दर्शविली होती, तर दुसरीकडे भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या रोहित पवारांची (Rohit Pawar) उपस्थिती दिसली.

सध्या राज्यातील आमदार एका प्रशिक्षणासाठी दिल्लीत आहेत. त्यानिमित्त शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसह भाजप आमदारांनाही निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आमदार आणि काही खासदार देखील उपस्थित होते. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आवर्जून उपस्थित दर्शवली होती. तसेच संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार, नितीन गडकरी आणि संजय राऊत एकाच रांगेत बसलेले दिसून आले. पवारांच्या कार्यक्रमात कोण होतं उपस्थित? -खासदार सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर हे खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नीलम गोऱ्हे, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोहित पवार, आदिती तटकरे, सुनील शेळके, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह भाजप आमदारांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. रावसाहेब दानवेंकडून कार्यक्रम आयोजित -रावसाहेब दानवे यांनी देखील एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची उपस्थिती दिसून आली. रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि भाजपकडून आयोजित दोन्ही कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा होत असल्याचे दिसून आले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here