जामखेड न्युज – – –
मुंबईच्या सांताक्रुझ येथील पोद्दार शाळेची ( Potdar International School) बस 5 तासानंतर सापडली आहे. 12 वाजता शाळा सूटल्यानंतर ही बस निघाली होती. पण मुलं वेळेत पोहोचलीच नाहीत. तब्बल 5 तास झाले तरी मुलं घरी आली नाहीत. त्यामुळे पालकांचा शाळेसमोर आक्रोश सुरु होता. पण आता बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती देखील पुढे येत आहे. त्यामुळे पालकांनी आणि शाळेने सुटकेचा निश्वास घेतला आहे. (Potdar School Bus Missing found)
सांताक्रूझच्या पोद्दार स्कूलची बस गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. मात्र अखेर ही स्कूल बस सापडली. विद्यार्थी आणि स्कूलबस सुरक्षित असल्याची माहिती पोद्दार स्कूलच्या वतीनं देण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळं बस वेळेत पोहोचू शकली नाही. असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे.
12 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचले नसल्याने पालकची चिंतेत होते. शाळेबाहेर पालकांचा आक्रोश सुरु होता. बातमी समोर आल्यानंतर आता चौकशीसाठी पोलीस पोद्दार स्कूलमध्ये दाखल झाले आहेत. या बसमध्ये जवळपास 15 विद्यार्थी होते.