जामखेड न्युज – –
गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत नगर मध्ये चालु असलेल्या हिन्दुनववर्ष निमित्त शोभा यात्रेच्या मिरवणुकीस कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षा पासुन ब्रेक लागला होता त्यामुळे दोन वर्ष हिन्दूनववर्ष निमित्त स्व-स्वरुप संप्रदायाची शोभा यात्रा मिरवणुक झालीच नाही मात्र चालू वर्षी कोरोना महामारीचे नियम शिथील झाले असल्याने चालू वर्षी हिन्दु नववर्ष निमित्त शोभा यात्रा वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व घोडे रथांच्या साथीने मोठ्या थाटामाटात सपन्न होणार असुन सदर मिरवणुक गुढी पाडव्या दिवशी शहरातील शिवाजी पुतळा माळीवाडा येथून या मिरवणुकीस प्रारंभ होणार असून शहरातील माळीवाडा- माणिक चौक -कापड बाजार- चितळे रोड- दिल्ली गेट या मार्गे जाऊन शेवटी दिल्लीगेट येथील मार्केडेय मंगल कार्यालयात साधारण 11 वाजेपर्यत या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात येईल.. सदर मिरवणुकी दरम्यान ढोल ताशा लवाजम्या सह वेगवेगळे आकर्षक असे देखावे सादर केले जाणार आहेत तसेच पालखी रथ असे आकर्षण असणार आहे तरी या सर्व उत्साही कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व भक्तगण, गुरुबंधू, गुरुभगिनी यांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे….