विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज – मामाच्या गावाला जाण्याचा मार्ग मोकळा

0
416
जामखेड न्युज – – – – 
 यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं नाराज होऊन बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना आता मामाच्या गावाला जाता येणार आहे. कारण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट होतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
                         ADVERTISEMENT 
मात्र आता एप्रिल महिना संपताच 2 मे पासून राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी 12 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर 13 जूनपासून विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. दुसरीकडे विदर्भातील विद्यार्थ्यांना मात्र 27 जूनपर्यंत सुट्ट्या मिळू शकतात. कारण उन्हाची तीव्रता पाहता विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरु होणार आहे.
दरम्यान, यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी मिळत असल्या तरी त्यांना दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्या वेळेस अतिरिक्त सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे असणार आहेत. मात्र या सुट्टया देत असताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त नसाव्या याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिलेत.
एप्रिलमध्ये शाळा पूर्णवेळ सुरु राहणार
गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळांमध्ये विस्कळीतपणा आला होता, तो दूर करण्याची मागणी शिक्षक, पालक यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिलमध्ये पूर्णवेळ शाळा सुरु ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. 100 टक्के क्षमतेने शाळा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर रविवारी देखील शाळा सुरु ठेवण्याची मुभा आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here