महाराष्ट्र निर्बंधमुक्त!!! ठाकरे सरकारनं हटविले कोरोना निर्बंध

0
243
जामखेड न्युज – – – – 
महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra) कोरोना निर्बंध (Corona Restrictions Removed) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. तर, रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
                          ADVERTISEMENT
राज्यातील जनतेला ठाकरे सरकारचा दिलासा
गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंध एकमतानं उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीनं जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय रमझान ईदचा सण उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका जोरात काढा, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा. राज्याची आपली परंपरा पुढं न्यावेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.  मास्क घालणं ऐच्छिक असल्याची माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते. आता राज्यात सर्व प्रकराचे निर्बंध हटवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here