रोहित पवार समर्थकांकडून जिवे मारण्याची धमकी ; भाजपच्या शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

0
215
जामखेड न्युज – – – 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे यांना वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. माजी मंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस सचिन पोटरे, दिलीप भालसिंग, अल्लाउद्दीन काझी, शेखर खरमरे, सुनील काळे, शोयब काझी, गणेश पालवे यांच्या शिष्ट मंडळाने पोलीस अधीक्षक पाटील यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.
                         ADVERTISEMENT
जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, १५ दिवसांत त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर करावा. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.  भाजपचे पदाधिकारी म्हणून व माजी मंत्री शिंदे यांच्या विकासकामांबद्दल पक्षातर्फे समाजमाध्यम व वृत्तपत्रांतून भूमिका मांडत असल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे हे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांद्वारे सातत्याने मोबाईलवर व प्रत्यक्षात जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे पोटरे यांनी निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पोटरे यांनी धमक्या देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावेही नमूद केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here