स्टेट बँकेची जामखेड शाखा म्हणजे असुन अडचण व नसुन खोळंबा

0
276

जामखेड प्रतिनिधी

    तालुक्यातील सर्वात मोठी बॅक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची जामखेड शाखेबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या आहेत. वेळेवर कामे होत नाहीत, ग्राहकांना नीट माहिती दिली जात नाही. केवायसी आधार लिंक साठी दोन महिने चकरा मारावयास लावतात पासबुक छपाई करुन मिळत नाही. स्टेटमेंट घेण्यास सांगतात व त्याचा वेगळा चार्ज लावतात. गरज नसताना क्रेडिट कार्ड घेण्याचा आग्रह करतात व अर्ज देऊनही बंद करत नाहीत भरमसाठ चार्ज आकारतात लोक दिवसभर रांगेत थांबुनही कामे होत नाहीत यामुळे जामखेडची स्टेट बँकेची शाखा म्हणजे असुन अडचण व नसुन खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
            क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अनेक वेळा आग्रह करतात स्टेट बँकेतून बोलतोय अशा फोन करुन बँकेत बोलवून घेतात एटीएम कार्डसारखेच क्रिडीट कार्ड आहे त्याला पैसे लागत नाहीत कोणतेही चार्ज लागत नाहीत अशा प्रकारे माहीती देऊन कार्ड दिले जाते .व त्याद्वारे पहिल्याच वेळेस कार्ड आले की आकाऊंडवरून कार्डचे 570/-रुपये घेतले जातात.  तसेच परत वेगवेगळे चार्ज लावतात. कार्डची गरज नसताना कार्ड देऊन अनामत रकमेतून कपात सुरू होते. कार्डचा एकदाही  वापर न करता. बँकेत कार्ड जमा करण्यास गेले असता बँक मॅनेजर उडवाउडवीचे उत्तरे देतात कार्ड बंद कसे करायचे सांगत नाहीत. कस्टमर केअर ला फोन केला असता रक्कम भरण्यास सांगतात. रक्कम भरली असता फोन करुन तुमचे पैसे परत रिफन्ड करू कार्ड चालू राहू दया बंद करता येत नाही  असे सांगतात . बँकेत कशाही प्रकारची माहिती देत नाहीत. बँकेचा त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही असे बँकेतील कर्मचारी व व्यवस्थापक सांगतात मग येणाऱ्या एजंन्टला बँकेत फोन टेबल खुर्ची कशी दिली जाते. अशाा अनेक स्वरुपाच्या तक्रारी बॅकेबद्दल आहेत. पासबुक छपाई करून दिली जात नाही. स्टेटमेंट घेण्यास सांगतात. त्याचा वेेगळा चार्ज आकारतात. एखाद्या ग्राहकांच्या केवायसी साठी दोन दोन महिने चकरा माराव्या लागतात. कोणत्याही टेबलवर नीट कामेे केली जात नाहीत कोणी काहीही मााहिती सांगत नाही.
  साधे खात्याला आधार लिंक करणे किंवा केवायसी करणे यासाठी चार ते पाच तास रांगेत थांबून कागदपत्रे दिले तर अधिकारी सांगतात आम्ही करुन घेऊ मात्र महिना दोन महिने झाले तरी आधार लिंक होत नाही परत परत बॅंकेत चकरा माराव्या लागतात यामुळे ग्राहकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
   याबाबत दैनिक सामनाशी बोलताना बाळू जरांडे म्हणाले की, मला फोन करून कसलाही चार्ज लागणार नाही म्हणून क्रेडिट कार्ड घ्यावयास लावले व नंतर चार्ज पडू लागले एका वर्षापासुन मी ते बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे अनेक वेळा बॅंकेत चकरा मारल्या तरीही ते बंद केले जात नाही. जून मध्ये सर्व रक्कम जमा केली कार्ड बंद केले नाही ब्लॉक केले गेले . डिसेंबर महिन्यात 2648 रु .  आता जादाचे चार्ज लावून आता 4600/रूपयाचे वर चार्ज लावला आहे . डिसेंबर मध्ये तक्रार अर्ज दिला त्यावेळेस बँक मॅनेजरने तुमचे पैसे परत रिफंन्ड करू असे सांगितले. मेल केला आहे. आज तागायत काहीही केले नाही. पुन्हा पैसे भरण्यास सांगतात. अशा प्रकारे ग्राहकांची एक प्रकारे लूट चालू आहे. त्यामुळे बऱ्याच बांधवाचे बँक क्रिडीट डाऊन करते. कर्ज घेताना सर्व क्रिडीट कार्डची रक्कम भरण्यास सांगतात . ग्राहकाची अशी होणारी लूट थांबवावी असे म्हटले आहे.
    पाडुंरंग मोहळकर यांनी सांगितले की, अनेक शाळांचे खाते या बॅंकेत आहे. एकतर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते पासबुक छपाई करून मिळत नाही तेव्हा स्टेटमेंट घेण्यास सांगतात व त्याचाही जादा चार्ज आकारतात यामुळे ग्राहकांना नाहक बुर्दड पडत आहे.
     शिक्षित लोकांचे एवढे हाल होतात तर अशिक्षित लोकांचे किती हाल होत असतील हे विचारावयास नको लवकरात लवकर बॅकेची कारभार लोकाभिमुख करावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here