अरणगाव ग्रामपंचायतवर दुसर्‍यांदा भाजपाची सत्ता – सरपंच पदी अंकुश शिंदे तर उपसरपंच पदी सविता राऊत यांची निवड

0
326
जामखेड प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष व माजी मंत्री प्रा. राम शिंदे, त्यांचे विश्वासू व भाजपाचे सरचिटणीस लहु शिंदे तसेच उद्योगपती अमोलशेठ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अरणगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी अंकुश अरूण शिंदे तर उपसरपंच पदी सविता आप्पासाहेब राऊत यांची निवड झाल्याने अरणगाव ग्रामपंचायत मध्ये दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने आपली सत्ता राखली आहे.
   अतिशय अटीतटीच्या लढतीत अकरा पैकी विरोधी गटाच्या सहा जागा निवडून येऊनही विरोधकांना सरपंच पद मिळवता आले नाही. सरपंच पदासाठी भाजपा कडुन अंकुश अरूण शिंदे तर राष्ट्रवादीकडून रब्बाना सादिक शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर उपसरपंच पदासाठी भाजपा कडुन सविता आप्पासाहेब राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रूपाली शंकर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते भाजपतर्फे गुप्त मतदानाची मागणी करण्यात आली त्यानुसार गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहा सदस्य आसतानाही एका सदस्याने भाजपाच्या सरपंच व उपसरपंचासाठी मतदान केले त्यामुळे अंकुश अरुण शिंदे यांना सहा तर रब्बाना शेख यांना पाच मते मिळाली तर उपसरपंचासाठी सविता राऊत यांना सहा तर रूपाली गदादे यांना पाच मते मिळाली यामुळे सरपंच पदी अंकुश शिंदे तर उपसरपंच पदी सविता राऊत यांनी निवड निवडणूक अभ्यासी अधिकारी दिपक लोंढे व सहाय्यक एल. व्ही. मुरकुटे यांनी घोषित केली. सरपंच व उपसरपंच निवडी जाहिर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष एकच जल्लोष केला.
     यावेळी जामखेड न्युजशी बोलताना लहुजी शिंदे म्हणाले की, आम्ही मागील पाच वर्षांत गावात विकासाची गंगा आणली याच विकास कामांमुळे विरोधी गटाच्या एका सदस्याने आम्हाला गुप्त मतदान केले आहे. आम्ही आता गटतट बाजूला ठेवून गावात राहिलेली विकास कामे मार्गी लावू असे शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here