जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी जवळके ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या
उषा सुभाष माने तर उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना संतोष वाळुंजकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीने गुलालाची उधलण करत कार्यकर्त्यांनी गावत एकच जल्लोष केला.

निवडणुकीत दिलेला शब्द पुर्ण करण्याचे वचन यावेळी
पॅनेलप्रमुख सुभाष माने व संतोष वाळुंजकर पाटील यांनी दिले. जवळके ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीने
७ पैकी ५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने सरपंच व उपसरपंच निवड एकमताने बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आले. बुधवार दि. १० रोजी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस एम अमृत यांच्या अध्यक्षते खाली बैठक झाली यावेळी सरपंच पदासाठी उषा सुभाष माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून संगीता दळवी यांनी सुचक म्हणून सही केली तर उपसरपंच पदासाठी वंदना संतोष वाळुंजकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून ऋषीकेश बोराडे यांनी सही केली. निवडणूक वेळेत सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण साठे, ऋषीकेश बोराडे, कुंतीबाई वाळूंजकर, सुमित्रा माने, संगीता दळवी हे उपस्थित होते.
ययावेळी बोलताना सटवाईमाता ग्रामविकास पॅनेलप्रमुख सुभाष माने म्हणाले निवडणूक काळात आम्ही काय काम करणार याबाबत जनतेला आश्वासन दिले होते ते पूर्ण करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज विठ्ठल रुक्मिणी मंदीराचे अपूर्ण काम सुरू करण्यासाठी नारळ
वाढवण्यात येत असून उद्यापासून काम सुरू होत आहे. आम्हाला या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते प्रा. सचिन गायवळ सर यांनी मोलाचे सहकार्य केले असे पॅनेल प्रमुख सुभाष माने यांनी सांगितले.
पॅनेलचे दुसरे प्रमख व शिवसेना तालुकाउपप्रमुख
संतोष वाळुंजकर पाटील म्हणाले की, आता निवडणूक संपली आहे यापुढील काळात गट तट न ठेवता कोणतेही राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करू शासनाची प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू. व सर्व आश्वासनाची पूर्तता करू असेही सांगितले.
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता
करण्यासाठी पॅनेलप्रमुख सुभाष माने यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर व ज्योतीबा मंदिर काम लगेच चालू करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी विठ्ठल रूक्मिणी मंदीरात हभप वसंत महाराज वाळूजकर यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दगडू वाळूंजकर यांनी १०० गोणी सिमेंट व मेजर रामचंद्र वाळूंजकर यांनी ५०
गोणी सिमेंट देण्याचे जाहीर केले तर ऋषीकेश बोराडे यांनी विठ्ठल रूक्मिणी मूर्ती देण्याचे जाहीर केले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.