Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

0
307
जामखेड न्युज – – – – 
राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  विधानसभेत दिली.
                      ADVERTISEMENT
 
पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार
Talathi Bharti 2022 – 1000 posts
अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.
वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.
तलाठ्यांना महसुली अभिलिखे ठेवणे व शासकीय अभिलिखे  ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारि असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्याने ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
⇒ एटापल्ली आणि भामरागड विभागात अनेक तलाठ्यांचे पदे रिक्त आहेत, त्याच्यामुळे अनेकांवर प्रभारी देण्यात आला आहे तरी येणाऱ्या दिवसात रिक्त पदे भरण्यात येईल.
जारावंडी परिसरात जारावंडी दिंडवी आणि वडसाखुर्द असे तीन साजे आहेत आणि या साज्या अंतर्गत जवळपास 24 गावे येतात आणि या सर्व गावांचा भार एकाच तलाठ्यावर असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.  2020 पूर्वी तीनही साज्यावर कार्यरत तलाठी होते. परंतु जारावंडी च्या महिला तलाट्याची काही कारणांस्तव शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार केली आणि त्या तलाठ्याची बदली करण्यात आली आणि वडसाखुर्द च्या तलाठ्याची इतरत्र बदली  करण्यात आली आणि या दोनही साज्यांचा भार दिंडवीच्या तलाठ्यावर सोपविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!