Wednesday, July 8, 2026
Home ताज्या बातम्या भर पावसाळ्यातही जामखेड तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर तर काही गावांमध्ये...

भर पावसाळ्यातही जामखेड तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर तर काही गावांमध्ये विहिर व बोअर अधिग्रहण

0
2

जामखेड न्युज – – – – – 

भर पावसाळ्यातही जामखेड तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर तर काही गावांमध्ये विहिर व बोअर अधिग्रहण

यावर्षीचा कडक उन्हामुळे बाष्पीभवन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी अनेक तलावातील पाणीसाठ्याचा उपसा झाल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्यात नान्नज येथे ३ तर खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मुंगेवाडी व नागोबाचीवाडी येथे १ व खुरदैठन १ असे पाच टॅंंकरने पाणीपुरवठा सुरू होता व तो अद्याप चालू आहे.

जुन महिन्यात पाऊस अत्यल्प असल्याने वाघा, बांधखडक, जवळके, राजेवाडी येथे प्रत्येकी एक टॅंकरने पाणीपुरवठा चालू आहे. तालुक्यात अद्याप ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून तेरा गावात विहीर व बोअर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अनेक जनजीवन योजना अर्धवट असून निधी अभावी कामे बंद आहे. तसेच यासाठी खोदलेल्या विहिरीत पाणी आले नाही. त्यामुळे जलजीवन योजना एक फार्स झाली आहे.

पावसाअभावी खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या जुन महीन्यांच्या शेवटच्या आठवडय़ात झालेल्या थोड्याफार पावसावर ५५ टक्के खरीप पेरण्या झाल्या पण पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागते का या विवंचनेत शेतकरी असताना ५ व ६ जुलै रोजी झालेल्या भीज पावसाने उगवलेली पिके तारली ७ जुलै अखेर १५२ मि. मी. पाऊस झाला परंतु अद्याप एकही नदी नाले, तलावात पाणी न आल्यामुळे भिषण टंचाईची चाहूल लागत आहे. तालुक्यात मागील दिड महिन्या पासून ९ टँकरने पाणीपुरवठा चालू आहे.

जामखेड तालुका रब्बीचा म्हणून ओळखला जात असला तरी खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मुग या नकदी पिकाच्या पैशावर शेतक-यांना बुस्टर डोस मिळत आहे. तालुक्यात खरीप पिकाचे उद्दीष्ट ६२ हजार १९५ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी तालुक्यातील खरीप पिकांच्या पेरण्या १५ जुन अखेर पुर्णत्वास येत असे पण यावर्षी जुन महिन्याच्या २३ तारखेपासून दोन तीन दिवस झिम पाऊस आला व त्या पावसावरच ३४ हजार ६४ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या.


पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. पण जुलै महिन्यात ५ व ६ रोजी भिज पाऊस झाला या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. अद्याप ४५ टक्के पेरण्या शिल्लक असल्यातरी जुलैचा दुसरा आठवडा उलटला आहे. रब्बी हंगामासाठी शेत मोकळे होऊ शकत नसल्याने तसेच आता पेरले तर उत्पादन व उत्पन्नात घट होणार असल्याने व अल निनो मुळे पाऊस लांबणार या पुढील शक्यतेमुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पेरण्या होऊ शकणार नाही. तालुक्यात सध्या सोयाबीन १५६१७ हेक्टर, उडीद ६८१७ हेक्टर, तुर ६११५,मका १२४२,ऊस ३३९१ हेक्टर क्षेत्रात आहे.

भुतवडा, खैरी प्रकल्प वगळता इतर तलाव कोरडेठाक
———————–
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला आहे. जुन महिन्यात सरासरी ११८ मि. मि. पाऊस पडला तर १ ते ७ जुलै अखेर ३३.९ मि. मि. पाऊस पडला आहे. त्यात सहा मंडलात कमी जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस खर्डा मंडलात २५२ मि. मि. तर सर्वात कमी पाऊस पाटोदा मंडलात अवघा २७.३ मि. मि. पडला आहे. त्याखालोखाल जामखेड ८० मिमी., अरणगाव १४४ मिमी., नान्नज ११६ मि. मी., नायगाव १०४ मिमी., साकत १०५.३ मि. मी. पाऊस पडला आहे. सरासरी जुन महिन्यात ११८ मि. मी. पाऊस झाला आहे. त्यातच खर्डा वगळता इतरत्र एकही मोठा पाऊस न पडल्यामुळे नदी नाले, ओढे व तलाव कोरडेठाक पडले आहेत. खैरी प्रकल्पात ४४.२५ दशलक्ष घनफूट तर जुना भुतवडा तलावात ५०.६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे तर रत्नापूर, धोत्री, मोहरी, घोडेगाव, धोंडपारगाव व नवीन भुतवडा तलावात निरंक पाणीसाठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!