जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान आयोजित देहदान संकल्प अभियान मध्ये जामखेड शहरात राहणारे पत्रकार प्रकाश खंडागळे वय ६९ यांनी स्वतः कोठारी प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये येऊन मरणोत्तर देहदानाचा फॉर्म भरला आहे.
ADVERTISEMENT

जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, ओंकार दळवी, समीर शेख, अविनाश बोधले, नंदन पटवा उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश खंडागळे म्हणाले माणसाचा देह हा मृतपावल्यानंतर काही काळ सुद्धा घरात ठेवत नाहीत त्याला जाळून राख होण्यापेक्षा माझ्या देहापासून कोणाला दृष्टी येईल तर कोणाला अवयव उपयोगी येतील तसेच माझ्या देहापासून बारा डॉक्टर शिकतील हे मला बऱ्याच दिवसापासून माहिती होते मी आज निश्चयच केला माझ्या वाढदिवसानिमित्त संजय कोठारी यांच्याकडे जाऊन आपला फॉर्म भरायचा माझ्या घरच्यांच्या सर्वांच्या परवानगीने मी हा देहदानाचा फॉर्म भरलेला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले आतापर्यंत आम्ही जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठान मार्फत ४५३ लोकांचे देहदान ,अवयवदान फॉर्म भरलेले आहेत त्यापैकी नऊ जणांचे देहदान केले आहे.
यावेळी बोलताना पत्रकार ओंकार दळवी म्हणाले गेली पंचवीस-तीस वर्षापासून कोठारी प्रतिष्ठान समाजसेवा करत आहे यामध्ये समाजाचे भान ठेवून पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी देहदानाचा संकल्प करून युवकांना प्रेरणा दिली आहे
यावेळी बोलताना पत्रकार अविनाश बोधले म्हणाले अवयव दान करून अनेकांना त्याचा फायदा होईल अशा उद्देशाने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे यांनी आज देहदान केले आहे त्यामुळे आमच्या सारख्या सर्व पत्रकारांना प्रेरणा मिळाली आहे आम्ही सुद्धा समाजात देह दान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करू असे सांगितले





