जामखेड न्युज – – –
जिल्हा परिषदेच्या शाळेतच माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

सिद्धार्थ वाघमारे असे माजी उपसरपंचाचे आणि परमेश्वर इंगोले असे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षांचे नाव आहे. मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे हे निर्गम उतारा घेण्यासाठी मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत आले होते. यावेळी ते मुख्याध्यापकांच्या दालनात बसले होते.
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले हे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी काही कारणावरुन वाघमारे आणि इंगोले यांच्यात शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
दरम्यान, इंगोले आणि वाघमारे यांच्यात हाणामारी सुरू झाल्यानंतर तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुख्यध्यापकांच्या समक्षच या दोघांमध्ये मारमारी झाली झाल्याने सध्या मालेगावात या हाणामारीची चर्चा आहे.