जामखेड न्युज – – – –
नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडून कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास होत असल्याने कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार व मंगळवार दोन दिवस नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन दोन दिवस चालले.आज तहसीलदारांच्या उपस्थितीत आंदोलन थांबवले. मुख्याधिकारी यांच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे लेखी पत्र घेऊन तहसीलदार योगेशजी चंद्रे यांनी ॲड. डॉ. अरुण जाधव यांना आदेशाचे दिले लेखी पत्र दिले यानंतर लेखणी बंद आंदोलन मागे घेतले
ADVERTISEMENT 

यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कार्यालयीन कर्मचारी यांना सतत अपमानास्पद वागणूक देत आहेत. कर्मचाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडल्या सारखे झाले आहे. मानसिक त्रास अपमानास्पद वागणूक व जाणीवपूर्वक छळ कर्मचाऱ्यांचा होत असल्याने त्यांचे मनोधैर्य खचून गेले आहे.त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
यावेळी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पत्र वाचून दाखवले संघटनेने केलेल्या मागणीनुसार चौकशी समिती नेमून समितीच्या अहवालानुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई होणार .कारवाई नाही झाल्यास आपण पुन्हा आंदोलन करू शकता असे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब म्हणाले.
तत्पूर्वी ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी संघटनेच्या मागण्या बाबत खुलासा केला कर्मचाऱ्यांना होत असलेला त्रास सी.ओ कडून मिळत असलेली अपमानास्पद वागणूक तात्काळ बंद नाही झाल्यास मी सर्वांना सोडेल तहसीलदार व प्रांताधिकारी यांना जबाबदार धरेल समितीच्या चौकशी अंती मुख्याधिकारी यांची बदली झालीच पाहिजे यावर ते ठाम राहिले.
तसेच लोक अधिकार प्रवक्ते बापू ओहोळ यांनी तहसीलदार साहेबांनी आणलेला लेखी खुलासा याबाबत सकारात्मक भूमिका संघटनेने घ्यावी व आंदोलन फार ताणण्या पेक्षा तहसीलदार साहेबाचं म्हणणं ऐकून घ्यावं ते जर आपल्याला मान्य असेल तर आंदोलन थांबवावं अन्यथा आपण पुढे आंदोलन चालू ठेवू अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली
यावेळी मा.नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपली भूमिका मांडून या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित मा. ॲड. डॉ. अरुण जाधव (अध्यक्ष कामगार संघटना नगरपरिषद जामखेड) मा. बापूसाहेब ओहोळ (प्रवक्ते लोक अधिकार आंदोलन). मा.आतिश पारवे (ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) मा. योगेश सदाफुले (जि उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) मा. आजिनाथ शिंदे (शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) मा. पांडुरंग भोसले (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड) अमित चिंतामणी (मा .नगरसेवक जामखेड) मा. ॲड .प्रवीण सानप, विशाल पवार, शिवकुमार डोंगरे, राम पवार, बाबासाहेब फुलमाळी, मच्छिंद्र जाधव, योगेश घायतडक, सतीश डिसले, राजेंद्र गायकवाड, प्रमोद टेकाळे, लक्ष्मण माने, सय्यद वलीमहंमद, अतुल राळेभात, आकाश सानप, संजय खेत्रे, संतोष खंडाळे, वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, राजू शिंदे ,अतुल ढोणे, अंकुश पवार, द्वारका ताई पवार उपस्थित होते.
तहसीलदारांच्या चौकशीच्या लेखी पत्रानंतर आंदोलन थांबवल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅड.अरुण जाधव यांनी जाहीर केले.