आरोपीना अटक करण्यासाठी गीते यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु – एक महिन्यापूर्वी सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने केली होती आत्महत्या

0
288
जामखेड प्रतिनिधी
                     जामखेड न्युज – – – 
             माझ्या मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असून तीन पैकी एक आरोपीस अटक करून अद्याप दोन आरोपी एक महिन्यापासून फरार असून त्यांच्यापासून माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून लवकरात लवकर आरोपीना अटक व्हावी या करीता नागोबाचीवाडी येथील भानुदास गीते यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून आरोपी जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.
                     ADVERTISEMENT
                      याबाबत सविस्तर माहिती अशी कि भानुदास गीते यांची कन्या शीतल रामदास वायभसे हिने सासरच्या जाचाला कंटाळून दि १६ फेब्रुवारी रोजी सासरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती,मयताचे वडील यांनी दि १६ फेब्रुवारी रोजीच जामखेड पोलीस स्टेशन मध्ये नवरा रामदास बळीराम वायभसे, सासू कुसुम बळीराम  वायभसे व दीर लखन बळीराम वायभसे यांच्या विरोधात भा द वि की ३०४ ब,३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते,दरम्यान आरोपी रामदास बळीराम वायभसे याना दि १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती मात्र अद्याप कुसुम बळीराम  वायभसे, लखन बळीराम वायभसे हे फरार असून त्यांच्याकडे मुलीचे पाच महिन्याचे बाळ असून आरोपींकडून बाळासह आमच्या जीविताला धोका आहे. एक महिना होऊनही आरोपीना अटक झाली नाही तसेच फरार आरोपी व त्यांच्या नातेवाईकांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत असून जीवे मारण्याची धमक्या देत आहेत,माझी मयत मुलगी शीतल हिचे ५ महिन्याची लहान मुलगी आरोपींच्या ताब्यात असून तिच्या जीवितास बरेवाईट करण्याचा धोका असून लहान बाळ आमच्या ताब्यात मिळावे या प्रमुख मागणीसह  भानुदास गीते यांनी कुटुंबियांसमवेत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे दरम्यान पोलीस सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी आरोपीना आठ दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलनकर्त्यांनी जो पर्यंत आरोपीना अटक होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here