जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जगतगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त श्री.विठ्ठल मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या वतीने आज शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी हि मिरवणूक ठरली.
ADVERTISEMENT 

संत साहित्याचे परंपरेनुसार पूजन करून ह.भ.प. विजयकुमार बागडे सर व्यासपीठ चालक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली होती. दररोज सायंकाळी ७ ते ९ नामांकित किर्तनकारांची किर्तने झाली. तरी या सप्ताहाची सांगता उद्या २१ मार्च रोजी काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रा.मधुकर राळेभात, गुलाब जांभळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अंकुश उगले, पंढरीनाथ राजगुरू,अशोक मुळे, सीताराम राळेभात, राहुल राळेभात, राजेंद्र राळेभात, आबासाहेब वीर, गोरोबा पतसंस्थेचे चेअरमन विनायक राऊत, पांडुरंग भोसले हे उपस्थित होते.
आज रविवार दि. २० रोजी दुपारी ३ ते ६ श्री जगद्गुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषधारी लोकांचे लक्ष वेधून घेत होते. टाळ मृदुंग गजरात शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते.









