Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या दरोडा प्रकरणातील सहा दरोडेखोरांना अटक – जामखेड तालुक्यातील एकाला अटक एक...

दरोडा प्रकरणातील सहा दरोडेखोरांना अटक – जामखेड तालुक्यातील एकाला अटक एक फरार

0
327
जामखेड न्युज – – – 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दरोडा प्रकरणातील सहा जणांना जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.
वैभव ऊर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फक्राबाद ता. जामखेड  जि. अहमदनगर), चालक संतोष झोडगे (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद), अजय देवगण ऊर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल ऊर्फ गुल्या सपा शिंदे (दोघे रा. शेळगांव ता. परांडा जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (रा. पांढरेवाडी ता. परांडा जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरोड्यातील अक्षय काळे (रा. पिंपळगांव ता. जामखेड जि.अहमदनगर), अनूज ऊर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी ता. भूम जि. उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत. विकास भोसले हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे.
                          ADVERTISEMENT
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, रविंद्र मांजरे, वळसंग पोलीस ठाण्यचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, अंकुश माने, सत्यजित आवटे, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, फौजदार शैलेश खेडकर, सुरज निबांळकर, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलीम बागवान, आबा मुंडे, मोहन मन्सावले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, रवी माने, दया हेंबाडे, अमोल माने, गोसावी, बारगीर, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितीन चव्हाण, पांडूरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, अन्वय अत्तार, रतन जाधव, देवा सोनलकर, शिंदे, प्रमोद माने, रामनाथ बोंबिलवार, केशव पवार, समीर शेख यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!