जामखेड न्युज – – – –
होळी धुलीवंदन हा बारा महिन्यातील एक मोठा सण आहे. त्या सणाला प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये आनंदात मजेत सण साजरा करतो. परंतु ज्यांच्या वाटेला सतत दुःख असते परिस्थितीशी झगडावे लागते अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. अशा गरीब कष्टकरी अनाथ, निराधार ,ऊसतोड मजूर, वीट भट्टी कामगार ,आदिवासी या समूहातील लोकांनी काय करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो , आपण येणारे सर्व सण आनंदात साजरे करावे अशी इच्छा खूप असते. पण गरीबी परिस्थिती वाईट आल्यामुळे इच्छेला पोटाला मारून कसेबसे जीवन जगावे लागते. नशिबी अठराविश्व दारिद्र्य आतापर्यंत मोठ्या लोकांचे सण आनंदात साजरा करतानी बघता बघता आयुष्य चालले रे बाबा !
Advertisement 

अशा अनाथ निराधारांचा नाथ गोरगरीब कष्टकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी सतत रस्त्यावर सरकार दरबारी भाडणारा गोरगरीब कष्टकरी जनतेचा कैवारी ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी) ता.जामखेड जि .अ नगर येथे सन- 2015 मध्ये सुरु केले. सुरुवातीला अगदी 8 विद्यार्थ्या पासून सुरुवात केली आता विद्यार्थी संख्या 71 आहे .ज्यांची शिकण्याची ईच्छा असते. परंतु शिकता येत नाही कपडे, दप्तर ,नसल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाही. पोटासाठी सतत वणवण करावे लागते.अशा अनाथ, निराधार, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण , सौताडा घाटाच्या डोंगराच्या पायथ्याशी, शुद्ध पाणी, सोलर वॉटर, बायोगॅस ,क्रीडा आरोग्य ,इत्यादी सोयी सुविधा या विद्यार्थ्यांना विनामूल्य दिल्या जातात.व गिरवतात शिक्षणाचे धडे.
या संस्थेला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. शासन मान्यता विनाअनुदानित तत्वावर असलेल्या निवारा बालगृहाला सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, कंपनी, ट्रस्ट दानशूर व्यक्ती, लोकांनी दिलेल्या मदतीवर या अनाथ निराधारांचे संगोपन केले जाते. यांनी दिलेली मदत अनाथांचे भविष्य घडवते स्वतः साठी अनेक जण जगतात. परंतु आपण जगता जगता अनाथांचे निराधारांचे अश्रू पुसणारे व अनाथांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा, लढण्याचा, हक्क आणि अधिकारचा, रंग भरवणारा बाप माणूस. ॲड. डॉ अरुण जाधव यावेळी उपस्थित केसकर सर ,संगीता पुणेकर, राजु शिंदे, संतोष चव्हाण (सोनेगाव) ,संतोष चव्हाण (भवरवाडी), स्वयंपाकीण ताई व विद्यार्थी उपस्थित होते .









