जामखेड न्युज – – – – –
लग्न जमण्यासाठी पोलीस असल्याची बनवाबनवी केल्यामुळे तरूणाला जेलमध्ये जावे लागले आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील हा नववी पास तरुण लग्नासाठी आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवत होता. नकली नाव , नकली वर्दी , नकली पिस्टल , नकली आधारकार्ड आणि थेट नकली पोलीस अधिकारी असलेले ओळखपत्र घेऊन हा भामटा मुलींना जाळ्यात ओढायचे काम करत होता. परंतु, एका तरूणीच्या सर्तकतेमुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांनी या तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT 

ही घटना ताजी असतानाच नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मधील काही हॉटेल चालकांना तोतया पोलिसांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत तालुका पोलीस स्टेशन मध्ये कोणता गुन्हा दाखल नसून मिळालेल्या माहितीनुसार एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ मध्ये बसून आलेले काही लोक पोलिस असल्याचे सांगत हॉटेलमध्ये खाऊन पिऊन हॉटेल चालका कडून काही रक्कम घेऊन पसार झाले आहेत. जेव्हा काही हॉटेल चालकांना या बाबत शंका अली त्या नंतर त्यांनी चौकशी केली असता हे पोलीस तोतया असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले मात्र तोपर्यंत हे तोतया पोलीस खाऊन पिऊन फरार झाले होते.