शेतक-यांना न्याय मिळवून देणार – माजी मंत्री शिंदे

0
279
जामखेड न्युज – – – 
शेतीपंपाची वीज महावितरणने खंडीत केल्यामुळे खुरदैठण येथील शेतकरी लक्ष्मन कदम यांनी ट्रान्सफॉर्मरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याची भेट माजी मंत्री राम शिंदे यांनी घेऊन यापुढील काळात शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, यापुढे शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटावर भाजप पूर्णपणे ताकदीनिशी उभी राहिल अशी ग्वाही दिली.
                      ADVERTISEMENT  
महावितरण विभागाने जामखेड तालुक्यात वीजकनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली. त्यामुळे खुरदैठन परीसरातील शेतकर्‍यांचे वीज बील थकल्यामुळे विद्युतरोहीत्र बंद केली आहेत. खुरदैठन येथील लक्ष्मण भिकाजी कदम यांनी आपल्या शेतात ऊस लावला आहे. तो पाणीटंचाईमुळे जळू लागला होता. त्यातच शेतकरी लक्ष्मण कदम यांच्या शेता जवळील कदम वस्ती येथील विद्युतरोहीत्र विजबील थकल्यामुळे दोन दिवसांपूर्वी बंद करून विजकनेक्शन कट केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी येथील विद्युतरोहीत्रावर चढुन चक्क विद्युतरोहीत्राच्या तारा हतात घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने रोहीत्रावरील वीजपुरवठा खंडित असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या नंतर खुरदैठणचे सरपंच ओंकार डुचे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठाकरे, शहाजी डुचे, ग्रामसेवक इम्रान शेख, ऋषिकेश डुचे, अब्बास सय्यद सह गावकर्‍यांनी आंदोलनकर्ते कदम यांची समजुत घालुन शेतकऱ्यास खाली उतरवण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माजी मंत्री शिंदे यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here