जामखेड न्युज – – –
जामखेड तालुक्यातील जवळा सेवा सोसायटीची निवडणुक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे जवळा गावाचे सरपंच प्रशांत शिंदे यांच्याविरोधात गावातील सर्वपक्षीय मातब्बर पुढारी एकवटल्याचे चित्र आहे. सेवा सोसायटीच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणूक रंगतदार होणार का ? बिनविरोध होणार याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भाजपचे जिल्हा चिटणीस अजिनाथ हजारे, राष्ट्रवादीचे माजी उपसभापती दिपक पाटील, राष्ट्रवादीचे माजी सरपंच प्रदिप दळवी, भाजपचे माजी सरपंच शहाजी वाळूंजकर, आय कॉग्रेसचे राजेंद्र पवार असे सर्वजण एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणूकांची चर्चा जोरात सुरु आहे.
ADVERTISEMENT 

१६६७ मतदार असलेल्या संस्थेत १३ उमेदवार निवडून येणार आहेत. १३ उमेदवारांना मतदान करण्याचा हक्क असणाऱ्या जवळा गावाच्या सेवा सोसायटीसाठी आत्तापर्यंत दोन्ही गटाच्या बाजूने ६४ अर्ज दाखल झाले. असून , याची २१ मार्चला छाननी होणार आहे. अर्ज माघारी घ्यायची अंतिम तारीख ५ एप्रिल असून उमेदवारांना निवडणूक चिन्ह ६ एप्रिलला मिळणार आहे. आणि प्रत्यक्षात मतदान १७ एप्रिलला होणार असून , निकालाचे धूमशान त्याच दिवशी कळणार असल्यामुळे निवडून येणाऱ्या गटाला लगेच गुलाल उधळण्याची संधी मिळणार आहे.
त्यामुळे आपलेच पारडं जड होण्यासाठी बैठका , गुप्त बैठकीला चांगलाच जोर आलेला दिसून येत आहे. उमेदवार निवडून आणून आपल्याच ताब्यात सोसायटी खेचून आणण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. यासाठी उमेदवार व गट चालकांनी आतापासूनच पायाला भिंगरी बांधून प्रचाराचे रान तापवण्यास सुरुवात केली आहे.
अशा तऱ्हेने जवळा सेवा सोसायटीची निवडणूक दुरंगी होणार असल्याचे बोले जात असून , उमेदवार निश्चित केलेला भाग पिंजून काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी तारेवरची कसरत चालू आहे. पार्टी चालक , उमेदवार कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून छुपा प्रचार सुरू आहे. पण अर्ज माघारी घ्यायची मुदत ५ एप्रिल असलेल्या लढत होईल का नाही हे ५ तारखे नंतर स्पष्ट होणार आहे.
अशी आहेत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे:
सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी
१) हजारे विष्णु बाबुराव
२) रोडे मोहन गणपत
३) कोल्हे संदिप किसन
४) वाळुंजकर अंगद नामदेव
५) कोल्हे पुरुषोत्तम मारुती
६) वाळुंजकर प्रभाकर हौसराव
७) गाढवे कुंडलिक विनायक
८) पठाडे सुरेश बाबु
९) वाळुंकर कैलास महादेव
१०) बारस्कर नवनाथ पोपट
११) लेकुरवाळे अनंता विश्वनाथ
१२) मुळे अंकुश शिवमुर्ती
१३) मुळे बाळु लक्ष्मण
१४) कोल्हे रामभाऊ बाबुनाथ
१५) वाळुंजकर नारायण
अण्णासाहेब
१६)वाळुंजकर ( पवार ) शहाजी
संभाजी
१७) पवार अनिल संभाजी
१८) मते काशिनाथ गहिनाथ
१९) शेख सायरा सत्तार
२०) शेख आलम कमाल
२१) मते बापुराव शिवदास
२२) हजारे राजेंद्र रामचंद्र
२३) रोडे अरुण नामदेव
२४) लेकुरवाळे संजय बाजीराव
२५) पागरे चंद्रहार किसन
२६) पागरे नारायण शिवाजी
२७) मते नवनाथ मुरलिधर
२८) लेकुरवाळे बाळासाहेब शंकर
२९) लेकुरवाळे अविनाश
काकासाहेब
३०) कोल्हे बाबासाहेब बापु
३१) हजारे अंगद पांडुरंग
३२) रोडे विठोबा विश्वनाथ
३३) हजारे नितीन रामलिंग
३४) पागीरे लक्ष्मण किसन
३५) मते हिरालाल महादु
३६) हजारे अमोल शंकर
३७) कथले शिवानंद सुभाष
३८) पागीरे लहु मधुकर
३९) मते रघुनाथ दादा
४०) कथले सुभाष मन्मथ
४१) दळवी प्रदीप किसनराव
४२) कसरे भाऊसाहेब सुभाष
महिला राखीव प्रतिनिधी
४३) शेख सायरा सत्तार
४४) हजारे ठकुबाई साधु
४५) रोडे भारती सुरेश
४६) पठाडे अनिता सुरेश
४७) हजारे सोजरबाई सखाराम
४८) हजारे सुमन अंगद
४९) हजारे अयोध्या रामलिंग
५०) रोडे सुमन भानुदास
५१) देवमाने कांताबाई लहु
इतर मागास प्रवर्ग
५२) कोल्हे शिवाजी तुकाराम
५३) कोल्हे बाबासाहेब बापु
५४) हजारे नितीन रामलिंग
५५) हजारे विष्णु बाबराव
५६) दळवी प्रदीप किसनराव
भटक्या विमुक्त जाती/जमाती
५७) गाढवे कुंडलिक विनायक
५८) सुळ मच्छिंद्र मारुती
५९) जाधव मुकुंदा यशवंत
६०) गोयकर किसन यशवंता
६१) सुळ भाऊसाहेब बाळिनाथ
६२) सुळ संतराम आजिनाथ
६३) आव्हाड सुशिल सुभाष
६४) आव्हाड रुपचंद तुकाराम