जामखेड न्युज – – – –
मागील दोन वर्षांपासून जगासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य होती. मात्र, आता पुन्हा एकदास कोरोना व्हायरसने डोके वर काढले आहे. त्यामुळे काही प्रमाणात सर्व देशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा एकदा जगावर कोरोनाच सावट आलं असून त्यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेनं मोठा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT 

काही दिवसांपासून चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. चीनमधील परिस्थिती लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येतंय. त्यामुळे चीनमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या इतर अनेक देशांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसू शकते असा इशारा WHO तर्फे जगभरातील देशांना देण्यात आला आहे.
भारत हा चीन शेजारील देश असून भारतात देखील याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, आता चौथी लाट लवकरच येणार असून जूनपर्यंत भारतात चौथ्या लाटेचा मोठा प्रभाव दिसून येईल, असा दावा शास्त्रज्ञानकडून केला जात आहे. त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाबाबत सातत्याने बैठकाही घेण्यात येत आहेत.
याशिवाय, कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा प्रभाव थोडा सौम्य राहिल्यामुळे कोरोनासंदर्भात असलेले निर्बंध देशभरात हटवण्यात आले होते. मात्र, सध्याची परिस्थिती बघता पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वानी कोरोनासंबंधी खबरदारी घ्यावी असं आवाहन सरकार तसेच आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
आशियातील देशांमध्ये प्रकरणे वाढणार
एका प्रसिद्ध या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, जगभरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढू शकतात, याचं कारण म्हणजे कोरोनाच्या चाचण्या सातत्याने कमी होत आहेत. तसेच गेल्या काही आठवड्यांपासून कमी प्रकरणांची नोंद होत आहे. याशिवाय, WHO च्या मते, आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात. जे चीनसारख्या देशात सध्या दिसून येत आहे.