जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. जनता समाधानी आहे. हे आज लागलेल्या पाच राज्यांतील निवडणूकीत मतदारांनी दाखवून दिले आहे.
विकास कामांच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. श्रेय वादाच्या लढाईत मला जायचे नाही असे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी सांगितले
राष्ट्रीय महामार्गाच्या आढळगाव ते जामखेड रस्त्याची पाहणी खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी केली यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक करण ढवळे, मकरंद काशिद भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे, मनोज कुलकर्णी, उद्धव हुलगुंडे,
पिंपरखेडचे सरपंच बापुराव ढवळे, अरणगावचे सरपंच लहु शिंदे, तात्या पोकळे, सुभाष जायभाय, श्रीराम डोके, प्रा. अरुण वराट, कैलास वराट, गोरख घनवट, अरूण म्हस्के, बंकटराव बारवकर, सलीम बागवान, तुषार बोथरा, महादेव वराट, संजय कार्ले, अर्जुन म्हेत्रे सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल बडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉ. विखे म्हणाले की, न्हावरा फाटा ते आढळगाव रस्ता पूर्ण झाला आहे तर आढळगाव ते जामखेड रस्त्याचे काम सुरू आहे. काम चांगल्या दर्जाचे सुरू आहे. दोन वर्षांच्या आत संपुर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल या विकास कामांच्या बळावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. कोणी काही म्हणत असले तरी हा विकास केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे मला श्रेय वादाच्या लढाईत जायचे नाही असेही सांगितले.