आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलच्या खास शुभेच्छा!!!

0
219
जामखेड न्युज – – – 
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त समाजात स्त्री निभावणार्‍या विविध रूपांनी सजलयं आजचं गूगल डूडल
IWD 2022 Google Doodle| Google Homepage
जगातील आघाडीचं सर्च इंजिन गूगलने (Google) आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने खास गूगल डूडल (Google Doodle) बनवले आहे. आज गूगलच्या होमपेजवर स्पेशल अ‍ॅनिमेटेड डूडल झळकत आहे. ज्यामध्ये समाजाच्या विविध स्तरावर काम करणार्‍या महिलांचं रूप पहायला मिळत आहे. यात महिला एक होम मेकर ते वैज्ञानिक असा तिची अनेक रूपं दाखवण्यात आली आहेत. हे देखील नक्की वाचा: Happy Women’s Day 2022 Wishes In Marathi: महिला दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत स्पेशल ‘तिचा’ आजचा दिवस!
डूडल व्हिडिओची सुरूवात घरात बाळाचं संगोपन करत लॅपटॉपवर काम करत एका ‘बिझी स्त्री’ पासून होते. नंतर झाडांना पाणी घालणारी, एक सर्जरी डिरेक्ट करणारी अशी अनेक रूपं तिची आहेत. दरम्यान आजचं गूगल डूडल Art Director Thoka Maer यांनी साकारलं आहे.
दरवर्षी 8 मार्च दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील महिलांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर केलेल्या उत्तुंग कामगिरीचं कौतुक केले जाते.
यंदा संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 ची थीम “Gender Equality Today for a Sustainable Tomorrow” अशी ठेवली आहे. आजही अस्तित्वात असलेल्या लिंगभेदासह महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून विविध क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणे आणि ओळखणे हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उद्दिष्ट आहे. हे 1911 पासून पाळले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here